मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलं संशयास्पद ड्रोन; संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर संशयास्पद ड्रोन दिसले आहे. संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 9, 2025, 10:39 PM IST
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलं संशयास्पद ड्रोन; संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं? title=

Drone At Mumbai Airport :  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर एक संशयास्पद ड्रोन आढळलं असून या ड्रोनमुळे विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील दुस-या क्रमांकाचं विमानतळ आहे. इथून दररोज सरासरी 1 हजार विमानांची ये-जा होते. जवळपास सर्वच विमानं भरून येत जात असल्याने प्रवाशांची गर्दीही आपसूकच विमानतळावर होत असते. यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय, कारण  विमानतळाच्या धावपट्टीवर एक संशयास्पद ड्रोन दिसून आले.

मुंबई विमानतळ हे ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलंय. अशातच संशयास्पद ड्रोन विमानतळ कर्मचा-यांनी पाहिलं. सुरक्षा यंत्रणेनं ते ड्रोन जप्त केलं आहे. मात्र धावपट्टी सारख्या संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं हा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई विमानतळावर  एप्रॉन एरियात म्हणजे (विमानं पार्क करण्याच्या जागेत) संशयास्पद ड्रोन दिसून आले.  ड्रोन उडताना पायलटनं पाहिलं. यानंतर तात्काळ सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवणयात आले. सुरक्षा दलाकडून ड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल जाली आहे. 

मुंबई विमानतळ आणि इतरही काही महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन उडवण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही संशयास्पद ड्रोन आढळल्यानं खळबळ उडाली आहे.  यामागचे धागेदोरे उलगडण्याचं काम पोलीस करत आहेत. 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती. शबिकुन नहर रुची असं या महिलेचं नाव आहे.. ढाक्याला जाणाऱ्या विमानात बसण्यापूर्वीच तिला अटक करण्यात आली होती. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले होते.