पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेत राहिलं. 9 महिन्यानंतरही या अपघातातील मृतांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्याआधीच आता आरोपींनीच न्यायाचा धावा केलाय आणि आपली अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय. पोर्शे कार अपघात प्रकरणात काय नवा ट्विस्ट आलाय.
पुण्यातल्या कल्याणनगरातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. या मे 2024 पासून अटकेत असलेले अल्पवयीन आरोपी मुलांचे आईवडील शिवानी आणि विशाल अगरवाल यांनी आता सुटकेसाठी कोर्टात याचिका दाखल केलीय. कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आम्हाला बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा अगरवाल दाम्पत्यानं आता केलाय. आमच्या सांविधानिक अधिकारांचं उल्लंघन झाल्याचा दावा करत अगरवाल दाम्पत्यानं मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेची मागणी केलीय.
'अटक बेकायदेशीर, आमची सुटका करा'
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट
आरोपी अगरवाल दाम्पत्याची कोर्टात सुटकेची याचिका
पुण्यात 19 मे 2024 च्या मध्यरात्री कल्याणीनगरात पोर्शे कारचा अपघात
आलिशना पोर्शेच्या धडकेत अश्विनी कोस्टा, अनिश अवधियाचा मृत्यू
अल्पवयीन आरोपीला न्यायालयाकडून निबंध लिहिण्याची शिक्षा
प्रचंड टीकेनंतर पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलले
याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई
आरोपी अल्पवयीन असल्यानं वडील विशाल अगरवालला अटक
रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपीची आई शिवानीलाही बेड्या
अपघातप्रकरणी एकूण 10 जणांना महिनाभरात अटक
विशाल आणि शिवानी अगरवालसह हे सगळे आरोपी मागच्या 9 महिन्यापासून तुरुंगात आहेत. गुन्ह्याचं स्वरुप बघात एकालाही अजूनही जामीन मिळालेला नाहीय. म्हणूनच आता अग्रवाल दांपत्यांनं आपली अटकच बेकायदेशीर असल्याचा नवा दावा केलाय आणि उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यांचा हा दावा कोर्टाच्या दारात कितपत टिकेल हे भविष्यात कळेलच.