Reverse Waterfall In Maharashtra : महाराष्ट्रात अशी दोन रहस्यमयी ठिकाणं आहेत जिथं न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम फेल ठरतो. जगातील सर्व वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले आहेत. ही ठिकाणं सातारा आणि पुण्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत. इथे हवेच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच उलट्या दिशेने धबधबे वाहतात. जमीनीकडून आकाशाच्या दिशेने प्रवाहित होणारे हे धबधबे निसर्गाचा अद्धबूत अविष्कार मानले जातात.
वरून पडणाऱ्या गोष्टी नेहमी जमिनीवर पडतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, महाराष्ट्रात असे दोन धबधबे आहेत जे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध प्रवाहित होतात. यापैकी एक आहे जुन्नर जवळचा नाणेघाट धबधबा. या धबधब्याला उलटा धबधबा असेही म्हणतात. हा धबधबा कोकण समुद्रकिनारा आणि जुन्नर नगरच्या मध्ये आहे. उलट्या दिशेने प्रवाहित होणारा हा धबधा पाहून पर्यटक थक्क होतात. हा धबधबा उंचीवरून खाली पडल्यानंतरही मागे सरकतो. धबधब्याचे जलस्रोत मुख्यतः नाणेघाटाच्या डोंगरातून आहेत. या ठिकाणच्या निसर्गसौंदर्यामुळे येत्या पावसाळ्यात या परिसरात मोठी गर्दी असते. शास्त्रज्ञांच्या मते या ठिकाणी वारे खूप वेगाने वाहतात, त्यामुळे पाणी उलट्या दिशेने वाहत असते. जोराच्या वाऱ्यामुळे धबधब्यातून खाली पडणारे पाणी पुन्हा वर येते.
पुण्यातील जुन्नरजवळील नाणेघाट येथे असलेला उलट्या दिशेने प्रवाहित होणारा कोकणकडा धबधबा प्रसिद्ध आहे. असाच धबधबा सातारा जिल्ह्यात देखील आहे. उलटया धबधब्याचा अविष्कार वाऱ्याच्या दाबावर अवलंबुन आहे. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारा नजारा पहायला मिळतो. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येतात. चाळकेवाडी पाटण रस्त्यानजीकच्या डोंगरकड्यजवळ हा अनोखा धबधबा आहे. वाऱ्याच्या वेगानं सडा वाघापूर धबधब्याचं पाणी जोरात मागे येतं. त्यामुळे हा उलटा धबधबा तयार होतो.