Mohammad Shami : टीम इंडिया सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तेथे 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहेत. पर्थमध्ये खेळलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियावर मात केली आणि सीरिजमध्ये 1- 0 अशी आघाडी घेतली. आता 6 डिसेंबर पासून दुसरा सामना हा भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पाडणार आहे. यापूर्वी टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या शमी देशांतर्गत क्रिकेट खेळत असून त्यात चांगली कामगिरी देखील करत आहे. भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती ज्यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र आता त्याची दुखापत पूर्णपणे ठीक झाली असून तो बंगालच्या संघाकडून रणजी ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत सेंटर ऑफ एक्सलन्स (पूर्वीची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) च्या क्रीडा विज्ञान विभागाकडून अंतिम मंजुरीची अपेक्षा करत आहे. ही मजुरी मिळाली तर शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे उर्वरित सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. शमीची फिटनेस कुठेही धोक्यात येऊ नये म्हणून हा पूर्णपणे स्वीकारलेला आणि योग्य निर्णय असावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे.
बीसीसीआयच्या बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये स्पोर्ट्स साइंस डिपार्टमेंटचे प्रमुख नितीन पटेल, प्रशिक्षक निशांत बर्दुले आणि निवडकर्ता एसएस दास यांना शमीचे निरीक्षण करण्यासाठी राजकोटला पाठवण्यात आले आहे. शमी येथील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालचे सर्व गट फेरीचे सामने खेळणार आहे. बीसीसीआयने नितीन आणि त्याच्या संघाला दिलेल्या संक्षिप्त माहितीमध्ये शमीला ऑस्ट्रेलियात भारतीय संघात सहभागी होण्यासाठी बोलावले तर तो कसोटी सामना खेळण्यास तयार होईल का, याचे निरीक्षण त्यांना करायचे आहे. बीसीसीआय शमीला स्पोर्ट्स साइंस डिपार्टमेंटची मंजुरी देत नाही तो पर्यंत बीसीसीआय त्याची निवड करणार नाही.
शमीने दुखापतीतून बरा झाल्यावर त्याने बंगलाकडून रणजी ट्रॉफी सामन्यातून पुनरागमन केले.पहिल्याच सामन्यात मध्यप्रदेशच्या एकूण 4 विकेट्स घेतल्या. शमीने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दमदार परफॉर्मन्स दाखवल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. मोहम्मद शमी हा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज असून त्याने आतापर्यंत भारताकडून 64 टेस्ट, 101 वनडे, 23 टी 20 सामने खेळेल आहेत. त्याने टेस्टमध्ये 229 विकेट्स, वनडेत 195 आणि टी 20 मध्ये 24 विकेट्स घेतले होते. 34 वर्षांच्या शमीने आयपीएलमध्ये 110 सामन्यात एकूण 127 विकेट्स घेतले आहेत.
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी