मुंबई : एकदिवसीय मालिका विजयानंतर आता भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आजपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका विजयाच्या ध्येयाने मैदानात उतरणार आहे. या विजयासाठी रोहित शर्मा एक तगडा संघ मैदानात उतरवणार आहे. या संघात टीम इंडियाचा स्टार खेळाडू 8 महिन्यानंतर मैदानात पुनरागमन करणार आहे. या खेळाडूच्या पुनरागमनाने वेस्ट इंडिज फलंदाजांचं टेन्शन वाढलं आहे.
वेस्ट इंडिज विरूद्ध टी-20 मालिकेत अनेक स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यामध्ये हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे.तसेच गोलंदाज रविचंद्रन अश्विनने 8 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. अश्विनने नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर चांगली कामगिरी करून त्याला टीम इंडियात आपले स्थान पक्के करायचे आहे.
रविचंद्रन अश्विनचा बॉलिंग फेस करणे इतके सोपे नाही. अश्विनचे गुगली बॉल तर दिग्गज खेळाडूंना चकमा देतो. कॅरम बॉल फेकण्यात तो उत्तम मास्टर आहे. त्याच्याकडे अफाट अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो.
रविचंद्रन अश्विन खालच्या फळीत स्फोटक फलंदाजी करण्यातही माहिर आहे. त्याने आपल्या फलंदाजीने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतके आहेत. त्याच वेळी, आयपीएल 2022 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना तुफानी अर्धशतकही झळकावले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.
कामगिरी
रविचंद्रन अश्विन टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. अश्विनने 86 कसोटी सामन्यात 442 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 112 एकदिवसीय सामन्यात 151 आणि 51 टी-20 सामन्यात 61 बळी घेतले आहेत. सध्या तो अनिल कुंबळेनंतर कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.