'त्यांनी स्वतःचं चांगभल...' निलम गोऱ्हेंच्या गंभीर आरोपांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!

Uddhav Thackeray On Neelam Gorhe Allegiance: निलम गोऱ्हेंच्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.

Pravin Dabholkar | Updated: Feb 23, 2025, 02:19 PM IST
'त्यांनी स्वतःचं चांगभल...' निलम गोऱ्हेंच्या गंभीर आरोपांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Neelam Gorhe Allegiance: शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. 2 मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचं असे त्या म्हणाल्या. दिल्लीत सुरु असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या.  मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' हा कार्यक्रम झाला. यात झालेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी आधीच्या पक्षावर खळबळजनक आरोप केला.  'असे घडलो आम्ही' मुलाखत कार्यक्रमात बोलतना निलम गोऱ्हे म्हणाल्या की, शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. माणसं गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिलं जायचं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायचं, असे त्या यावेळी म्हणाल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांवरही गंभीर आरोप लावल.ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरेंनी निलम गोऱ्हेंच्या आरोपांना तात्काळ उत्तर दिलंय. 

उद्धव ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर 

निलम गोऱ्हेंच्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.  हे सगळे गयेगुजरे लोकं आहेत. त्यांनी स्वतः चांगभल करून घेतलं आहे. त्या महिला आहेत त्यावर मी काही बोलणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मर्सडीज मधून फिरणाऱ्या लोकांना विचारा लाडक्या बहिणींना पैसे का नाही मिळाले? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.स्वतः मर्सडीज मधून फिरतायत मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या? असा प्रश्नही ठाकरेंनी विचारला.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील निलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलंय. निलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरेंनी 4 वेळा आमदार केले. त्यांनी किती मर्सिडिज दिल्या? 8 मर्सिडिज दिल्या का? त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात, असे संजय राऊत म्हणाले.