'स्वत:च्या मृत्यूचा विचार करुन राजेश खन्ना दिवसभर...'; गर्लफ्रेंडने सांगितलं शेवटच्या 'त्या' काही दिवसांबद्दल

Rajesh Khanna Manifested His Own Death :  राजेश खन्ना यांनी स्वत: Manifest केलं होतं त्यांचं मरण

दिक्षा पाटील | Updated: Feb 23, 2025, 01:01 PM IST
'स्वत:च्या मृत्यूचा विचार करुन राजेश खन्ना दिवसभर...'; गर्लफ्रेंडने सांगितलं शेवटच्या 'त्या' काही दिवसांबद्दल
(Photo Credit : Social Media)

Rajesh Khanna Manifested His Own Death :  बॉलिवूडचे काका अर्थात दिवंत अभिनेता राजेश खन्ना यांच्या आणि डिंपल कपाडिया यांच्या लव्ह स्टोरी विषयी सगळ्यांना माहित आहे. त्या दोघांनी 1973 मध्ये लग्न केलं मात्र लग्नाच्या काहीच वर्षात ते विभक्त देखील झाले. दोघांनी वेगळं राहण्यास सुरुवात केली पण त्यांनी एकमेकांना कधी घटस्फोट दिला नाही. राजेश खन्ना यांचं नाव हे अनीता अडवाणी यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. अनीका या राजेश खन्ना यांच्या कथित गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, आता अनीता यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या म्हणाल्या की राजेश खन्ना यांचं निधन होण्या आधी त्यांना काय काय त्रास झाला आणि ते रडत राहायचे. 

YouTube चॅनल अवंती फिल्म्सला अनीता यांनी ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अनीता यांनी राजेश खन्ना यांच्या निधनाच्या आधीचा काळ सांगितला. ते शारिरीक आणि भावनिकदृष्ट्या खचले होते असं त्यांनी सांगितलं. अनीता म्हणाल्या, '1 वर्षात त्यांच्यात काहीही त्रास राहिले नव्हते. त्यांना मी तसं पाहू शकत नव्हते. ते दिवस-दिवस रडत राहायचे. अनीता यांना पुढे विचारण्यात आलं की राजेश खन्ना यांना त्यांचा शेवट दिसत होता का? तर त्या म्हणाल्या, त्यांनी स्वत: मरण मागितलं. त्यांनी त्यांचं मरण हे मॅनिफेस्ट केलं.' 

अनीता पुढे म्हणाल्या, 'जवळपास 28 वर्ष त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. कारण डिंपल यांच्यापासून ते विभक्त झाले होते. जेव्हा अनीता यांना राजेश खन्ना यांच्या स्वभावाविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या त्यांचा शांत स्वभाव होता. ते कधीच हिंसक नव्हते. पण कधी कधी ते माझ्यावर हात उगारायचे. मग मी पण त्यांना मारायचे ही माझी असलेली रिफ्लेक्स रिअ‍ॅक्शन होती.'

हेही वाचा : 'ते कधी कधी मला मारायचे आणि मी...', राजेश खन्नांच्या गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

जेव्हा अनिताला राजेशच्या स्वभावाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या, 'तो खूप शांत होता आणि कधीही हिंसक नव्हता, पण कधीकधी तो मला मारायचा. मी त्यांना पुन्हा मारायचो. ती माझी रिफ्लेक्स रिअ‍ॅक्शन होती. तो म्हणायचा की माझ्या नखाने त्यांना लागलं की ते म्हणायचे तुझ्या नखांमुळे मला दुखापत झाली.'