तिसरी टेस्ट सुरु असतानाच 3 खेळाडूंना टीम इंडियातून काढलं बाहेर, BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय

IND VS AUS 3rd Test : सध्या गाबा येथे टेस्ट सीरिजचा तिसरा सामना खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. 

पुजा पवार | Updated: Dec 15, 2024, 12:24 PM IST
तिसरी टेस्ट सुरु असतानाच 3 खेळाडूंना टीम इंडियातून काढलं बाहेर, BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु आहे. सध्या गाबा येथे टेस्ट सीरिजचा तिसरा सामना खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या सीरिजची शेवटची टेस्ट 3 जानेवारी ते 7  जानेवारी 2025 दरम्यान खेळवली जाणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी 17 खेळाडूंसोबत तीन ट्रॅव्हलिंग रिजर्व खेळाडूंना देखील या दौऱ्यावर सोबत घेण्यात आले होते. यात यश दयाल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचा समावेश होता. मात्र आता तीन खेळाडूंना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान रिलीज करण्यात आले आहेत. या तीन वेगवान गोलंदाजांना आता 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

यश दयाल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी हे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाचा भाग होते. पण टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला की या तीन खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी द्यायला हवी, ज्यामुळे हे मैदानावर त्यांची लय आणि फिटनेस कायम ठेवतील. टीम इंडिया आता गाबानंतर मेलबर्न आणि सिडनी येथे टेस्ट सामना खेळेल, त्यानंतर संपूर्ण संघ भारतात परतेल. 

हेही वाचा : Video : मियां मॅजिक! सिराजने बेल्ससोबत असं काही केलं की पुढच्या ओव्हरला लाबुशेनची विकेटच पडली

उत्तरप्रदेशसाठी खेळणार यश दयाल : 

खलील अहमदच्या जागी यश दयाल याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सहभागी करण्यात आले होते. खलील हा नेटसेशन दरम्यान पूर्णतः फिट नसल्यामुळे यश दयालला टीम इंडियाकडून बोलावणे आले. आता भारतात परतल्यावर यश हा उत्तर प्रदेश संघाकडून विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. 

बंगालसाठी खेळणार मुकेश  कुमार : 

मुकेश कुमारसाठी हा दौरा खूपच लांब आणि आव्हानात्मत होता. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी इंडिया ए संघासोबत मुकेश कुमार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. आता भारतात परतल्यावर ती बंगाल संघाकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळेल. 

दिल्लीसाठी खेळणार नवदीप सैनी : 

नवदीप सैनीला इंडिया ए कडून फक्त 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. ब्रिसबेन टेस्टच्या पहिल्या दिवशी त्याने स्टँड्समधून खेळ पाहिला, पण आता तो दिल्लीच्या संघाकडून खेळण्याच्या तयारीत आहे.  

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.