कौतुक करावं तितकं कमी; मुकेश अंबानींच्या लेकीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रचला विक्रम

Isha Ambanis Reliance Retail Sets A Record : ईशा अंबानीनं वडिलांचं नाव पुन्हा उज्ज्वल केलं. कौतुकास्पद कामगिरी करत रिलायन्स उद्योग समुहामध्ये दिलं मोलाचं योगदान. पाहा तिनं असं केलंय तरी काय?   

सायली पाटील | Updated: Jan 18, 2025, 10:07 AM IST
कौतुक करावं तितकं कमी; मुकेश अंबानींच्या लेकीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रचला विक्रम title=
Isha Ambanis Reliance Retail Sets A Record Opening Over 2 Stores Every Day in a year

Isha Ambanis Reliance Retail Sets A Record : रिलायन्स उद्योग समुहाला फक्त देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांनी आता त्यांच्या कारभाराची मोठी जबाबदारी त्यांच्या पुढच्या पिढीवर अर्थात त्यांच्या मुलांवर सोपवली आहे. आकाश, अनंत आणि ईशा अशी त्यांची तिन्ही मुलं त्यांच्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी कमालरित्या सांभाळताना दिसत आहेत. इतकंच काय, तर आता अंबानींच्या लेकीनं म्हणजेच ईशा अंबानीनं तर थेट एक विक्रमच आपल्या नावे केला आहे. 

ईशाच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत असणाऱ्या रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) नं मागील वर्षी 2024 मध्ये एकूण 779 नवे स्टोअर सुरू केले. म्हणजेच मागील वर्षभरामध्ये दर दिवशी 2 हून अधिक स्टोअर सुरू करण्यात आले, हा एक प्रकारचा विक्रमच असल्याचं सांगितलं जात आहे. या विक्रमी कामगिरीसह देशभरात रिलायन्स रिटेल स्टोअरची एकूण संख्या आता 19012 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षभरात 29 कोटी 30 लाख ग्राहकांनी खरेदी केल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

रिलायन्सकडून जारी करण्यात आलेल्या तिमाही आकडेवारीतून ही सर्व माहिती समोर आली. ज्यानुसार 2024-25 त्या तिसऱ्या तिमाहीमध्ये रिलायन्स वेंचर्स लिमिटेडनं 90333 कोटी रुपयांचं राजस्व नोंदवलं. मागील वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी 8.8 टक्क्यांनी जास्त असल्याचं सांगितलं गेलं. इतकंच नव्हे, तर कंपनीचा EBITIDA सुद्धा वाढून 6828 कोटींवर पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. 

खुद्द मुकेश अंबानी यांनीसुद्धा रिलायन्स रिटेलच्या या प्रशंसनीय कामगिरीकडे लक्ष वेधत सर्व विभागांमध्ये या कंपनीनं दमदार कामगिरी केल्याचं म्हणत ग्राहकांच्या खरेदीचा अनुभव आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. 

हेसुद्धा वाचा : अवकाशात कशी झाली डॉकिंग? साऱ्या जगानं पाहिली ISRO ची कर्तबगारी; पाहा भारावणारा Video 

ईशा अंबानीनं या क्षेत्रातील ज्ञान आणि भविष्यातील प्रगतीच्या शक्यता चाचपडत घेतलेल्या निर्णयांमुळं तिच्या या दूरदृष्टीचं सध्या व्यवसाय क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे. रिलायन्स डिजिटलनं आतापर्यंत ई कॉमर्स, डिजिटल सुविधा आणि ऑनलाईन विक्रीच्या क्षेत्रात सकारात्मक कामगिरी केली आहे. या कंपनीची यंदाच्या वर्षातील कामगिरी कशी असेल, याचीच चर्चा आणि उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे.