टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी आली आहे आणि अभिनेता अमन जयस्वाल यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. अमन 23 वर्षांचा होता आणि 'धरतीपुत्र नंदिनी' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध होता. तो ऑडिशनसाठी जात असताना जोगेश्वरी महामार्गावर हा अपघात झाला. त्याच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली असल्याच सांगण्यात येत आहे.
'धरतीपुत्र नंदिनी' या टीव्ही शोचे लेखक धीरज मिश्रा यांनी 'इंडिया टुडे डिजिटल' ला पुष्टी दिली की, त्यांच्या शोचे आवडते कलाकार आता आपल्यात नाहीत. अमनच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
असं म्हटलं जातं की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा अमन त्याच्या ऑडिशनसाठी जात होता. हा अपघात जोगेश्वरी महामार्गावर घडला, जिथे त्याच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. मुंबईचे डीसीपी झोन 9 दीक्षित गेडाम यांनी माहिती दिली की, अमन जयस्वाल यांच्या अपघाताची घटना दुपारी 3.15 वाजता हिल पार्क रोडवर घडली. आरोपी, ट्रक चालक, याने मोटारसायकलवरून जाणाऱ्या पीडितेला (मृत) चिरडले. पीडितेला तातडीने ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे त्याचा मृत्यू झाला. आरोपी आणि ट्रक ताब्यात आहे. आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
दिग्दर्शक धीरज मिश्रा यांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर अमन जयस्वाल यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, 'तू आमच्या आठवणींमध्ये जिवंत राहशील. तुझ्या मृत्यूने आम्हाला जाणीव करून दिली आहे की देव कधीकधी किती क्रूर असू शकतो.'