वाल्मिक जोशी, जळगाव : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु डेल्टा प्लस व्हेरिएंटने आता डोके वर काढले आहे. या विषाणूचे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा निर्बंध लागू केले आहे.
जळगाव जिल्ह्यात डेल्टा आणि डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात रुग्णवाढ होऊ नये म्हणून प्रशासनाने पुन्हा निर्बंध वाढवण्यास सुरूवात केली आहे.