राज ठाकरेंचे फटकारे, निमित्त मोदी-पवार 'व्हॅलेंटाईन डे'चं!

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंमधील व्यंगचित्रकार पुन्हा सक्रिय झाले. 

Updated: Feb 16, 2015, 03:08 PM IST
राज ठाकरेंचे फटकारे, निमित्त मोदी-पवार 'व्हॅलेंटाईन डे'चं! title=

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंमधील व्यंगचित्रकार पुन्हा सक्रिय झाले. राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर आपल्या व्यंगचित्राद्वारे टीका केली. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंचे फटकारे पाहायला मिळतायेत. यावेळी निमित्त ठरलंय मोदी-पवार 'व्हॅलेंटाईन डे' भेटीचं...

१४ फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन डे'ला शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर होते. मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांसोबत आपण कसे फोनवर बोलतो, याचा गौप्यस्फोटही केला. या भेटीवरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केलीय. राज ठाकरे यांनी आपल्या कार्टुनच्या माध्यमातून मोदी आणि पवार यांच्या भेटीवर बोट ठेवलंय.
 
व्यंगचित्रात पवार आणि मोदी एकमेकांना जेवण भरवत आहेत. 'पवार भ्रष्टाचारी आहेत हे मोदींनी तुम्हाला सांगितलं होतं, आता तुम्ही त्यांच्या पंगतीला बसायचं नाही' असं संघाचा कार्यकर्ता सामान्य माणसाला सांगत आहे, अशा आशयाचं हे कार्टून आहे. 
 
दिल्लीत आपच्या विजयामुळं भाजपच्या झालेल्या पानिपतावरही राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाष्य केलं होतं, त्यानंतर आशीष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. आता या नव्या व्यंगचित्रानं कोणता वाद निर्माण होतो, हे पाहावं लागेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.