Farmer Sucess Story: अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान याचा फटका पिकांवर बसला आहे. त्यामुळं पिकांचे नुकसान तर होतेच पण उत्पन्नही तितकेसे येत नाहीत. त्यामुळं शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने तरुणांनी नोकरीचा मार्ग पत्करला आहे. मात्र, अलीकडे पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीची कास पकडत आहेत. असाच एक प्रयोग कल्याणच्या दोन तरुणांनी केला आहे. या तरुणांनी एका एकरातून तब्बल 4-5 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
सुशिक्षित तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीत फुलवला मिरचीचा मळा फुलवला आहे. एक एकर शेतीत त्यांनी जवळपास ८ हजार मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे. यातून त्यांना तीन ते चार रूपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. वातावरणातील बदलामुळे रोपांवर रोगाचा प्रार्दुभाव होऊन उत्पादन घटण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
कल्याण तालुक्यातच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित तरूण शेतीकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. तालुक्यातील रूंदे गावातील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या कैलास काळू राम चौधरी व मोगेश पंढरीनाथ सासे या दोन तरुणांनी आपल्या एक एकर शेतीत तीन प्रकरच्या मिरचीच्या जातीच्या रोपांची लागवड केली आहे.
मिरचीच्या रोपांची लागवड करण्यासाठी ३५ हजार रुपयांचा खर्च आला असून या पोटी त्यांना चार महिन्यांत तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे रोपांवर परिणाम झाल्याने रोपांवर किड व मर रोगाची लागण झाल्याने वारंवार किटक नाशकांची फवारणी करावी लागल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे.
साताऱ्यातील महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पिकणारी स्ट्रॉबेरी आणि त्याची गोडी वेगळीच असते. या अशा स्ट्रॉबेरी पिकाचं या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. महाबळेश्वर मध्ये पिकणारी ही स्ट्रॉबेरी फक्त जिल्ह्यातच नाही तर परराज्यात सुद्धा जाऊ लागली आहे. कर्नाटक, केरळ त्याचबरोबर कलकत्ता या राज्यात देखील स्ट्रॉबेरीची मागणी वाढते आहे. त्यामुळेच एक्सपोर्ट कॉलिटी ची स्ट्रॉबेरी उत्पादन करण्याचा प्रयत्न या भागातील शेतकरी करताना दिसतात. स्ट्रॉबेरी सोबत ज्वारी लसूण अशी अंतर्गत पिके देखील घेतली जातात. इटली येथून स्ट्रॉबेरीची रोपे मागवून त्यापासून अनेक रोपे बनवली जातात आणि ती रोपे विकून त्यातूनही या भागातील शेतकरी चांगले पैसे कमावत आहेत.