Mumbai Metro Update: केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल केला जात आहे. मुंबई लोकल आणि मुंबई मेट्रोला आर्थिक रसद तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असून मेट्रोसाठी अर्थसंकल्पात 1,255.06 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील तरतूदीमुळं मेट्रो प्रकल्पांना आर्थिक रसद मिळणार आहे.
एमएमआरडीएच्या प्रवासी सुविधेसाठी अर्थसंकल्पात 792.35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, निती आयोगाच्या माध्यमातून देशभर ग्रोथ हब उभारले जाणार आहेत. मुंबईबरोबरच ठाण्यातही मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी कर्ज दिले आहे. या सर्व प्रकल्पांसाठी सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च आहे. या खर्चातही केंद्र आणि राज्य सरकारने उचलला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गंत रेल्वे प्रकल्पांसाठी 611.48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लोकलसाठीचा हा निधी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई उपनगरात रेल्वेचे विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळं या निधीचा वापर करुन लोकलसेवा अधिक सक्षम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती मिळणार?
मुंबई, पुणे मेट्रो, हायस्पीड रेल्वे
मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
पुणे मेट्रो : 699.13 कोटी
एमयुटीपी : 511.48 कोटी
एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी