Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. थंडीचा गारवा कमी झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 2, 2025, 08:02 AM IST
Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं? title=

राज्यात यंदा वातावरणात खूप मोठा बदल पाहायला मिळाला. यंदाचा हिवाळाही अगदी तसाच गेला. हिवाळ्यातही कमी थंडी जाणवली तसेच या दिवसांत उन्हाचा छळा देखील तितक्याच पोहोचल्या. आज मुंबईचे तापमान 21.99 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे. मौसम विज्ञान विभागाने ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच सर्वाधिक तापमान 25.62 अंश सेल्सियस असणार आहे. 

कसा होतो वातावरणात बदल 

ला निना आणि एल निनोची नावे ऐकली असतील. ला निना हा प्रशांत महासागरात आढळणारा एक हवामान नमुना आहे तर एल निनो हा एक नैसर्गिक हवामान नमुना आहे. पूर्व प्रशांत महासागरात समुद्राचे पाणी थंड झाल्यामुळे ला निना परिस्थिती उद्भवते, तर एल निनो आपल्यासोबत उबदार पाणी आणते.

यंदा थंडीचा कडाका फारसा न जाणवण्याचं कारण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि सातत्याने होणारे ढगाळ हवामान. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडाही काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. राज्याच्या हवामानात मोठे बदल होत असून, पुढील दोन दिवसांत ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामानाची नोंद

निफाड येथील संशोधन केंद्रात 9.8अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, परंतु राज्यातील इतर भागांत यापेक्षा अधिक तापमान राहिले. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ भागांत दिवसा उन्हाचा जोर कायम राहिला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व राजस्थानातील गंगापूर येथे देशातील सर्वात नीचांकी 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, परंतु महाराष्ट्रात अशा स्वरूपाची थंडी जाणवली नाही.

पश्चिम भारतात, विशेषतः राजस्थानात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आणि दक्षिण केरळमध्ये 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील हवामान बदलत असून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज

हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असणार आहे. कारण अचानक पावसाचा फटका काही हंगामी पिकांना बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात वायव्य दिशेने 12.6 किलोमीटर उंचीपर्यंत 130 नॉट्स वेगाने पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमान बदलत्या परिस्थितीवर अवलंबून राहील.