ठाणे : दहीहंडी म्हटले की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूककोंडी हे ओघाने आले. ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
दहीहंडीतील मानवी मनोऱ्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे ठाण्याच्या पाचपाखाडी परिसर 'संघर्ष' मंडळाने यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे 'संघर्ष' दहीहंडी उत्सव मंडळाचे सर्वेसर्वा आहेत. दहीहंडी उत्सव रद्द झाल्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि धांगडधिंग्यातून सूटका झाल्याची भावना इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली.