शाहरूख खानला ईडीकडून पुन्हा समन्स, शेअर्स हस्तांतरणाचा घोळ

२००८ मध्ये कोलकाता नाईट राईडर्सचे शेअर्सचे हस्तांतरिण करताना केलेल्या घोळाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला ईडीनं तिसरं समन्स बजावलंय. 

Updated: Oct 27, 2015, 09:36 AM IST
शाहरूख खानला ईडीकडून पुन्हा समन्स, शेअर्स हस्तांतरणाचा घोळ title=

मुंबई: २००८ मध्ये कोलकाता नाईट राईडर्सचे शेअर्सचे हस्तांतरिण करताना केलेल्या घोळाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला ईडीनं तिसरं समन्स बजावलंय. 

आणखी वाचा - जेव्हा शाहरूखने पत्नीला म्हटले Thanks..

शाहरूख खानच्या कंपनीनं अभिनेत्री जुही चावलाचे पती जय मेहताचे यांच्या नावानं काही शेअर्स हस्तांतरित केले. हे हस्तांतरण करताना शाहरुखच्या कंपनीनं शेअर्सची किंमत बाजार भावापेक्षा आठ पटीनं कमी आकारल्याचं पुढे आलंय. याआधी शाहरुखची २०११ मध्ये परकीय चलनाच्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी झालीय.

आणखी वाचा - 'डीडीएलजे'ला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शाहरूख काजोलला म्हणाला....

मात्र नुसतं समन्स बजावून कारवाई नाही, ईडी याबाबतीत अॅक्शनमध्ये दिसत नाहीय. शाहरूख खान आरामात रोहित शेट्टीच्या दिलवालेचं शूटिंग करतोय आणि एजंसी त्याच्याविरोधात कोणतीही अॅक्शन घेत नाहीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.