महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव! घरात, दारात, अंगणात जिकडे तिकडे फुलंच फुलं आणि मंत्रमुग्ध करणारा सुगंध

Maharashtra Rose Village : महाराष्ट्रातील यासुंदर गावाना पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे. जाणून घेऊया हे गाव नेमके आहे तरी कुठे? 

वनिता कांबळे | Updated: Feb 22, 2025, 04:00 PM IST
महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव!  घरात, दारात, अंगणात जिकडे तिकडे फुलंच फुलं आणि मंत्रमुग्ध करणारा सुगंध

Parpar Village in Mahabaleshwar : प्रसंग आनंदाचा असो दुख:चा असो. काही न बोलता मनातील भावना व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे गुलाबाचे फुल. याच गुलाबाच्या फुलाने महाराष्ट्रातील एका गावाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील एक गावाने हे महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव असा नावलौकिक मिळवला आहे.   

सातारा जिह्यातील पारपार गाव हे महाबळेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. या गावाला आता गुलाबाचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ही संकल्पना मांडली, आणि ग्रामपंचायत पारपारने ती स्वीकारली. पारपार गावाच्या या नव्या ओळखीमुळे, पुस्तकांचे गाव भिलार आणि मधाचे गाव मांघर यांच्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील हे तिसरे विशेषत्व प्राप्त करणारे गाव ठरले आहे. 

गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच, गुलाबांच्या लागवडीमुळे पर्यावरणीय आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुलाबांच्या फुलांचे उत्पादन आणि विक्री स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते, तसेच पर्यटकांच्या वाढीमुळे गावातील रोजगाराच्या संधी वाढू शकतात.पारपार गावाच्या या उपक्रमामुळे, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे, जो इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव

महाबळेश्वर परिसरातील मांघर हे गाव देशात मधाचे गाव म्हणून ओळखले जाणारंय..राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मधाचे गाव नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे..यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आलीय..मांघर गावात 80 टक्के लोक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात.