कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिक टार्गेट, बेळगावमध्ये संतापजनक प्रकार

Kannada Organizations: कानडी संघटनांनी मराठी भाषिकानी कानडी कंडक्टरला मारहाण केल्याचा कांगावा केला. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 22, 2025, 03:50 PM IST
कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिक टार्गेट, बेळगावमध्ये संतापजनक प्रकार
मराठी भाषिक टार्गेट

Kannada organizations: बेळगावमध्ये पुन्हा एकदा कानडी संघटनानी दिशाभूल करून मराठी भाषिकांना वेठीस धरणाच्या प्रयत्न सुरू केल्याच समोर आलं. बेळगाव जिल्ह्यातील बाळेकुंद्री इथं अल्पवयीन मुलींचीं छेड काढल्या प्रकरणी कानडी कंडक्टरला जाब विचारात मारहाण करण्यात आली होती. कंडक्टरने अल्पवयीन मुलीचे छेड काढल्या प्रकरणी त्याच्यावर मारहाळ पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला.

पण कानडी संघटनांनी मराठी भाषिकानी कानडी कंडक्टरला मारहाण केल्याचा कांगावा केला. चित्रदुर्गमध्ये महाराष्ट् एसटी बस आणि बस कंडक्टरला काळे फासले. या घटनेनंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. पण प्रत्यक्षात कानडी संघटनांनी कानडी कंडक्टरने केलेला गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिकांनाच टार्गेट केल्याचे दिसून आलं. मारहाळ पोलीस स्टेशनमध्ये संबंधित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद होऊन त्याची चौकशी सुरू झाली आहे.

पण कानडी संघटनानी मराठी भाषिकाच्या द्वेशापोटी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर देखील टिकेची झोड उठवली आहे. एका अल्पवयीन मराठी भाषिक मुलीचा विनयभंग झाला म्हणून रीतसर गुन्हा दाखल झालाय. पण याचे देखील भांडवल करण्याचा प्रयन्त कानडी संघटना करत आहेत. त्यामुळे सीमा भागातून तीव्र संताप व्यक्त होतोय.