मासिक पाळीमुळे 'राष्ट्रगीता'ला उभी राहिली नाही, अमिषा पटेलच्या कारणावर कुशालचा आरोप

ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.

Updated: Oct 27, 2015, 08:56 AM IST
मासिक पाळीमुळे 'राष्ट्रगीता'ला उभी राहिली नाही, अमिषा पटेलच्या कारणावर कुशालचा आरोप title=

मुंबई: ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.

कुशालनं ट्वीट केलं होतं की थिएटरमध्ये चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत सुरू होतं आणि त्याच्या पुढील सीटवरची तरुणी उभी राहण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होती. त्यानंतर त्याला दिसलं की ती सामान्य तरुणी नाही तर अभिनेत्री अमिषा पटेल होती. यावर अमिषानं स्पष्टीकरण देत ट्विट केलं, अचानक मासिक पाळी आल्यामुळे मी उभी राहू शकली नाही. जर उभी झाली असती तर फ्लोरवर रक्त सांडलं असतं. 

अमिषानं कुशालच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं, कुशाल सारख्या लोकांना थोबाडित मारण्याची गरज आहे. अमिषा म्हणाली मला माहित नव्हतं कुशाल याला राष्ट्रीय मुद्दा बनवेल.

यानंतर कुशालनं उत्तर देत लिहिलं, 'जेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हा मला अजिबात वाटलं नाही तुमचे पिरियेड्स सुरू आहेत, कारण फिल्म सुरू होण्यापूर्वी तुम्ही खूप हसत-खेळत होतात आणि राष्ट्रगीत सुरू होण्याआधी पासच्या स्टॉलजवळ उभं राहून खात होती. माझी पण आई आणि बहिण आहे... मी त्यांचा जितका सन्मान करतो, तेवढाच आपल्या देशाचाही करतो.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.