विटाळामुळे केदारनाथचा महाप्रलय !

 केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी अजब तर्क लढवला आहे. नास्तिकांनी मलविसजर्न करून परिसराचे पावित्र्य भंग करणो हेच केदारनाथ या हिंदूंच्या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रची गेल्या वर्षीच्या महाप्रलयात पार वाताहात होण्याचे मुख्य कारण आहे, असा अजब तर्क केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी लढविल्याने तज्ज्ञमंडळी चक्रावून गेली आहे.

Updated: Sep 18, 2014, 02:30 PM IST
विटाळामुळे केदारनाथचा महाप्रलय ! title=

डेहरादून :  केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी अजब तर्क लढवला आहे. नास्तिकांनी मलविसजर्न करून परिसराचे पावित्र्य भंग करणो हेच केदारनाथ या हिंदूंच्या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रची गेल्या वर्षीच्या महाप्रलयात पार वाताहात होण्याचे मुख्य कारण आहे, असा अजब तर्क केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी लढविल्याने तज्ज्ञमंडळी चक्रावून गेली आहे.

केदारनाथ खो:यातील महाप्रलय आणि तेथील पुनर्निर्माणाचे काम याविषयी उमा भारती यांनी अलीकडेच येथील ‘हिमालयन इन्स्टिटय़ूट ऑफ ग्लेशिओलॉजी’ आणि ‘फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या संस्थांमधील तज्ज्ञांशी विचारमंथन केले, तेव्हा मंत्र्यांनी हे मत व्यक्त केले.

उमा भारती यांचे म्हणणो असे होते की, सन 1882 र्पयत सरस्वती नदी त्या परिसरात दृश्य स्वरूपात वाहत होती व मंदाकिनी आणि सरस्वती या नद्यांनी या तीर्थक्षेत्रभोवती नैसर्गिक हद्द तयार केलेली होती. त्यावेळी या भागात मानवी मलविसजर्नास मज्जाव होता. कालांतराने प्रामुख्याने व्यापाराच्या उद्देशाने या भागात नास्तिक आले व त्यामुळे सन 2क्13 मध्ये केदारनाथवर निसर्गाचा कोप झाला.
 
अचानक झालेली ढगफुटी व अतिवृष्टी हे या प्रकोपाचे नैमित्तिक कारण असले, तरी 61 हजार लोकांचा बळी घेणा:या या आपत्तीचे मूळ कारण मानवी मलविसजर्न हेच असल्याचे आपले मत असल्याचे उमा भारती म्हणाल्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.