Mumbai Local: कुर्ला स्थानकातील गर्दी कमी होणार, 'हा' महत्त्वाचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास अधिक आरामदायी व सुलभ व्हावा यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आणखी एका प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 6, 2025, 01:20 PM IST
Mumbai Local: कुर्ला स्थानकातील गर्दी कमी होणार, 'हा' महत्त्वाचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर title=
mumbai local train update Harbour line to take elevated route at Kurla

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकात मोठ्याप्रमाणात गर्दी असते. मध्य आणि हार्बर अशा दोन्ही मार्गावरील नागरिक कुर्ला येथे उतरत असल्यामुळं प्रवाशांची खूपच गर्दी होते. अनेकदा या गर्दीतून वाट काढणेही कठिण होऊन बसते. मात्र लवकरच या स्थानकातील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे चुनाभट्टी-टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारत आहे. या प्रकल्पांतर्गंतच कुर्ला उन्नत स्थानक होणार आहे. हा प्रकल्प 2025च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकल्पामुळं गर्दीचे नियोजन होणार आहे. 

चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. याचा फायदा पनवेल-कुर्ला दरम्यान प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. पाचवी सहावी मार्गिका कुर्लाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत नेण्यासाठी मध्ये रेल्वेसमोर जागेची अडचणी आहे. त्यामुळं चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका आहेत मात्र त्यावरुन मेल, एक्स्प्रेस चालवल्या जातात. त्यामुळं लोकल फेऱ्यावर आणि गतीवर मर्यादा येताता. म्हणूनच कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांत 7-8 जवळ उन्नत मार्ग बनवण्यात येणार आहे. या मार्गाची लांबी 1.1 किमी इतकी आहे. 

या प्रकल्पामुळं पनवेल-कुर्ला प्रवास अधिक जलद होणार आहे. उन्नतच्या कामासाठी हार्बर मार्गावरील दोन फलाट आठ मीटर वर उचलले जाणार आहेत. त्यासाठी टिळकनगर स्थानकापुढे सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपुल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ उतरेल आणि तेथून सध्याच्या मार्गाला जोडला जाईल. येथे एक टर्मिनल फलाटही उभारला जाणार आहे. 

हार्बर मार्गावरील अनेक प्रवासी पनवेल-कुर्ला या दरम्यान प्रवास करतात. त्यामुळं या प्रवाशांसाठी हा मार्ग खूप फायद्याचा ठरणार आहे. या मार्गाची लांबी 1.1 किमी आहे. तसंच, कसाईवाडा येथे तीन फलाट उभारण्यात येणार आहेत. तिथे पादचारी पूल, स्कायवॉक बनवण्यात येणार असून खाद्यपदार्थाची दुकाने, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा प्रदान करण्यात येणार आहे.