Walmik Karad : वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीतील आश्रमात मुक्कामी होते, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला.15 आणि 16 डिसेंबरला हे दोघे आश्रमात मुक्कामी असल्याचा दावा त्यांनी केलाय..दरम्यान या आरोपांना दिंडोरी आश्रमाचे प्रवक्ते आबासाहेब मोरे यांनी हे आरोप खोडून काढलेत.
फरार असताना वाल्मिकचा दिंडोरीत आश्रय?
स्वामी समर्थ केंद्रात 2 दिवस मुक्काम केल्याचा आरोप
स्वामी समर्थ केंद्रानं वाल्मिकबाबतचे आरोप फेटाळले
पवनचक्की खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला होता. फरार असताना वाल्मिक कराडनं नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्रात आश्रय घेतल्याचा आरोप होऊ लागलाय. 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. सीआयडीनं स्वामी समर्थ केंद्रात छापा टाकल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केलाय.
स्वामी समर्थ केंद्रानं सीआयडी छाप्याचा दावा फेटाळून लावलाय. नाशिकचे काही अधिकारी केंद्रात आले होते. त्यांनी चौकशी केल्याचा दावा स्वामी समर्थ केंद्रानं केलाय.
वामी समर्थ केंद्रात रोज हजारो भाविक येतात त्यामुळं या गर्दीत कुणी आलं असेल तरी त्याची कोणतीही माहिती आपल्याकडं नसल्याचं केंद्राचं म्हणणं आहे. शिवाय त्यांनी तृप्ती देसाईंनी केलेले आरोपही फेटाळून लावलेत.
वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड उज्जैनला गेला होता. तिथून तो नाशिकमध्ये दिंडोरीत आला होता. गुन्हा करायचा आणि फरार असताना देवदर्शन करायचं असा फंडा वाल्मिक कराडनं वापरला होता. त्याच्या या देवदर्शनामुळं स्वामी समर्थ केंद्रावर नाहक आरोप झालेत.