पुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण

Ajit Pawar : पुण्यात एका नेत्यानं दोन नागरिकांना मारहाण केलीय. यातल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेर यांच्याकडून झालेल्या  मारहाणीवरुन टीकेची झोड उठलीय.

वनिता कांबळे | Updated: Jan 26, 2025, 10:09 PM IST
पुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण title=

Pune Crime News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरेंनी जागेच्या वादातून विजय रौंदळ आणि प्रशांत जाधव या दोघांना मारहाण केलीय.त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जमिनीच्या वादातून चांदोरेनं विजय रौंधळला आधी कानशीलात लगावली, नंतर उचलून जमिनीवर आपटलं. यात विजय रौंधळच्या डोक्याला आणि गुडघ्याला मार लागला. हा सगळा प्रकार कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदारासमोरच घडला. 
सध्या रौंधळ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पीडित प्रशांत जाधव यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय. मात्र बाबुराव चांदेरे हे अजित पवारांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्यावर कडक कारवाईऐवजी किरकोळ गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रशांत जाधव यांनी केलाय. 

काही महिन्यांपूर्वी चांदेरेंची रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा आरोप बाबुराव चांदेरेंवर आहे. आता जागेच्या वादातून दोघांना मारहाण केली आहे.  यावरुन आता विरोधकांनी सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केलीय. दरम्यान पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तक्रार दिली तर नक्की कारवाई होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय.  

आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात  धनंजय मुंडेंवर आरोप होऊनही त्यांची पाठराखण केल्यानं अजित पवारांवर टीकेची झोड उठलीय. त्यात पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यातल्या माजी नगरसेवकाची दादागिरी अजितदादांसाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळं अजित पवारांनी वेळीच आपल्या पक्षातल्या नेत्यांना समज देणं गरजेचं आहे.. 

कोण आहेत बाबुराव चांदेरे?

बाबुराव चांदेरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
चांदेरे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष
पुण्यातल्या बावधन , पाषाण भागात ते राष्ट्रवादी काँग्रेसचं काम पाहतात
सध्या ते राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक
बारामतीत भरवलेल्या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनात चांदेरेंचा सहभाग