प्रगतीपुस्तकात नापास, तरी मंत्रिपदाची आस; संजय राठोडांचा मंत्रिपदावर दावा!

Sanjay Rathod Lobbying: महायुतीच्या मंत्रिमंडळात कोण असणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 12, 2024, 08:37 PM IST
प्रगतीपुस्तकात नापास, तरी मंत्रिपदाची आस; संजय राठोडांचा मंत्रिपदावर दावा! title=
संजय राठोड

Sanjay Rathod Lobbying: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोडांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेकडून संभाव्य मंत्र्यांच्या तयार करण्यात आलेल्या प्रगतीपुस्तकात संजय राठोड नापास असल्याची चर्चा आहे.. याच चर्चांवर भूमिका मांडत आपण नापास होऊच शकत नाही असं म्हणत राठोड यांनी मंत्रिपदावर दावा केलाय.

महायुतीच्या मंत्रिमंडळात कोण असणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे. महायुतीच्या 235 आमदारांपैकी मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. मंत्रिमंडळात कर्तबगार मंडळी सामील करण्याचा आग्रह झाल्यानं शिवसेनेने संभाव्य मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केलंय.प्रगतीपुस्ताकात नापास असलेल्या माजी मंत्र्यांना यंदा डच्चू दिला जाणार असल्याची माहिती समोर येतेय.त्यामध्ये शिवसेनेच्या दोन माजी मंत्र्यांच्या नावांची चर्चा होती. यात माजी मंत्री संजय राठोड प्रगतीपुस्तकात नापास असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली होती. मात्र मी निरंतर जनतेसाठी काम करतोय. त्यामुळे मी नापास असूच शकत नसल्याचं संजय राठोड यांनी म्हटलंय. 

2021 मध्ये आपल्यावर झालेल्या आरोपानंतर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि चौकशीत आपल्याला क्लिनचिट मिळाल्याचं सांगायलाही संजय राठोड विसरले नाहीत.दुसरीकडे संजय राठोड यांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग करायलाही सुरूवात केल्याचं पाहायला मिळतंय.. पोहरादेवीच्या महंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत संजय राठोडांना मंत्रिपद देण्याची मागणी केलीय.

संजय राठोडांनी समोर येऊन आपली बाजू मांडली.. आणि आपण नापास नसल्याचं म्हटलंय.. आता शिवसेनेच्या प्रगतीपुस्तकात अजून किती आमदार पास आणि किती नापास हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

6 मंत्री पास

शिंदे सरकारमधील 6 मंत्री पास झालेत. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेत. इच्छुकांपैकी 5 आमदार मंत्रिमंडळ समावेशासाठी पात्र ठरलेत सध्या 11 जण मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी तयार  असल्याचं सांगण्यात येतंय. आता मुख्यमंत्री शिवसेनेच्या सर्व मंत्र्‍यांचा शपथविधी एकदाच करतात की दहा जणांचा समावेश करुन दोन ते तीन जणांना वेटिंगवर ठेवतात का याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेकडून अकरा जण मंत्रिमंडळ समावेशासाठी उत्सुक आहेत. शिंदे सरकारच्या काळात अब्दुल सत्तार यांनी अनेक वाद ओढवून घेतले होते. शिवाय त्यांच्याविरोधात अनेक भ्रष्टाचाराच्याही तक्रारी आहेत. दुसरे नेते संजय राठोड यांचा कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. या दोन्ही नेत्यांच्या नावावर शिवसेनेनंही फुली मारल्यानं त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणं थोडं अवघड झालंय. आता या अकरा नेत्यांपैकी कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबतच्या उत्सुकतेवरचा पडदा येत्या काही दिवसांतच हटणार आहे.

मंत्री पदाच्या शर्यतीत असलेले आमदार

१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भूसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दिपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जून खोतकर
११) विजय शिवतारे

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोडांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेकडून संभाव्य मंत्र्यांच्या तयार करण्यात आलेल्या प्रगतीपुस्तकात संजय राठोड नापास असल्याची चर्चा आहे.. याच चर्चांवर भूमिका मांडत आपण नापास होऊच शकत नाही असं म्हणत राठोड यांनी मंत्रिपदावर दावा केलाय.