Shikhar Dhawan Mystery Girl: भारतीय क्रिकेटचा 'गब्बर' शिखर धवन नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या खेळासाठी तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अधिकृत राजदूत असलेला शिखर धवनचा दुबईत भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मॅचचा आनंद लुटताना आणि राजदूताची कर्तव्ये पार पाडत असताना, तो एका मिस्ट्री गर्लसोबतही होता. शिखर धवनचे या महिलेसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. पुढे ऑनलाइन व्हायरल होताच त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले. आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या आयुष्यात प्रेमाने नवी एंट्री केली आहे का? ते फक्त मित्र आहेत, किंवा त्यांच्यात अजून काही आहे? अशा प्रश्नांचा पूर नेटिझन्सला पडले आहेत.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान शिखर धवनच्या बाजूला एक मुलगी बसलेली दिसली. हे कॅमेऱ्यात कव्हर होताच त्यांचा हा एकत्र बसून सामना बघतानाच व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की या महिलेचे नाव सोफी शाइन आहे आणि ती आयर्लंडची आहे. शिखर आणि तिच्या नात्याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही, पण चाहते मात्र या मिस्ट्री गर्लला शोधत आहेत. शिखर धवन सोबतचे तिचे नाते समजून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
हे ही वाचा: पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप
Men will be men ft. #ShikharDhawan pic.twitter.com/BfV28bXiv2
— tere naina (@nainaverse) February 21, 2025
शिखर धवन सोशल मीडियावर सोफीला फॉलो करतो हे लक्षात आल्यावर त्याच्या चाहत्यांना या दोघांमध्ये काही तरी असल्याचे वाटत आहे. इन्स्टाग्रामवर सोफीचे प्रोफाइल खाजगी आहे आणि तिचे फक्त 6,000 फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, एका अहवालात असे म्हटले आहे की धवन सोफीसोबत कॅमेरामध्ये दिसण्यास संकोच करत होता आणि कॅमेरे त्याच्यावर आले असताना चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केला होता. त्याच्या या वर्तनामुळे रहस्यात भर पडली आहे. तो कॅमेऱ्यासमोर तो इतका का लाजत होता असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हे ही वाचा: पाच विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने कोणाला दिले 'फ्लाइंग किस'? खेळाडूने स्वतःच दिले स्पष्टीकरण
आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतल्यानंतर धवनने आपले वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवले आहे. मात्र, त्याचे नाव यापूर्वी इतर मुलींशी जोडले गेले होते, परंतु त्यापैकी कोणाचीही पुष्टी झाली नाही. आता तो सोफीसोबत उघडपणे दिसल्याने, ती फक्त एक मैत्रीण आहे की आणखी काही हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.