मोदींकडून 'छावा' चित्रपटाचं कौतुक, विकी कौशलने मानले आभार, म्हणाला...

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 22, 2025, 01:03 PM IST
मोदींकडून 'छावा' चित्रपटाचं कौतुक, विकी कौशलने मानले आभार, म्हणाला...

Chhaava Movie : विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने प्रदर्शित होताच 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. कमी दिवसांमध्ये जास्त कमी करून या चित्रपटाने नवीन इतिहास रचला आहे. सर्वत्र 'छावा' चित्रपटाचं कौतुक होत आहे. त्यासोबतच अभिनेता विकी कौशलच्या अभिनयाचे देखील राजकीय नेते, मराठी कलाकार आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'छावा'चित्रपटाचं कौतुक केलंय. त्याचबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या भूमिकेचेही मोदींनी कौतुक केलं. 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. यावेळी मोदींनी 'छावा' चित्रपटाचं देशभरात किती कौतुक झालं यावर देखील भर दिला. तर शिवाजी सावंत यांच्या 'छावा' याच्या ऐतिहासिक कादंबरीची देखील त्यांनी चर्चा केली. या कादंबरीतून त्यांनी संभाजी महाराजांच्या शौर्याची ओळख करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलत होते. 

विकी कौशलने मानले मोदींचे आभार

सध्या सर्वत्र 'छावा' चित्रपट खूप गाजत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकी कौशलचं कौतुक करताच अभिनेता खूप खूश झाला. अभिनेत्याने मोदींच्या कौतुकानंतर त्यांचे आभार मानले आहेत. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कौतुक करतानाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, 'शब्दांच्या पलीकडे मिळालेला आदर', पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मी तुमचा खूप आभारी आहे, असं त्याने म्हटलं आहे. तर विकीसोबतच मॅडॉक फिल्म्सनेही नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाने जगभरात सात दिवसांमध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.