कुंकवामुळे महिलांचं मानसिक आरोग्य उत्तम राहत असेल तर विधवांना त्याची गरज नाही का? डॉ. तारा भवाळकरांचा सवाल

दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यावेळी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी महिलांच्या मानसिक आरोग्याबद्दल केलेलं विधान चिंतन करायला लावणारं.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 22, 2025, 11:46 AM IST
कुंकवामुळे महिलांचं मानसिक आरोग्य उत्तम राहत असेल तर विधवांना त्याची गरज नाही का? डॉ. तारा भवाळकरांचा सवाल

दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शुक्रवारी उद्घाटन झालं. या उद्घाटनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे सगळ्यांच लक्ष वेधून घातलं. डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, कुंकू किंवा टिकली अतिशय महत्त्वाची आहे. कारण यामुळे महिलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या विधानानंतर डॉ. तारा म्हणाल्या की, मग याची गरज लग्न झालेल्या महिलांना की विधवांना अधिक आहे? यामागे सायंटिफिक रिझन असल्याचं म्हटलं जातं. पण विज्ञानाच्या नावाखाली अशा खोट्या गोष्टी पसरवणे ही अतिशय चुकीची गोष्ट सुरु असल्याचं म्हटलं आहे. 

डॉ. भवाळकर यांनी पुढे सांगितलं की, त्या एका लोककलेच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी एका मुलीने गोंधळ सादर केला.  यामध्ये त्या मुलीने महिलांना कपाळाला कुंकू लावणे किती आवश्यक आहे आणि यामागे विज्ञानाची काय जोड आहे? याबद्दल माहिती दिली. 
यामध्ये सांगितलं की, बायकांना फार मानसिक त्रास असतो. कपाळाला इथे मधोमध दोन भुवयांच्यामध्ये दाब बिंद असतो त्या असतो दुवर कुंकवामुळे दाब पडतो आणि त्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ हे सुरळीत होतं. त्या मुलीचं सगळ ऐकल्यावर नंतर डॉ. भवाळकर यांना प्रश्न पडला की, कुंकुवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचं मानसिक स्वास्थ ठीक होत असेल तर मानसिकदृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे. लग्न झालेल्या बायकांना का विधवांना? 

कारण विधवा महिला ही अनेक मानसिक समस्यांमधून जात असते. अशावेळी विधवांना जास्त आधाराची गरज आहे. कारण मानसिकदृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत. तर विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार. मग या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय आहे? असा सवाल यावेळी समेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी विचारला आहे. 

दिल्ली येथे  98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेन सुरु आहे. या संमेलनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. संमेलनाच्या 71 वर्षांमध्ये पहिल्यांदा हे दिल्ली येथे संपन्न होत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले पाहायला मिळाले.