फराह खानकडून हिंदूंच्या भावना दुखावणारं विधान; पोलीस तक्रार दाखल! म्हणाली, 'होळी हा छपरी...'

Farah Khan Holi Remark : फराह खाननं होळीवर केलेल्या वक्तव्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या...

दिक्षा पाटील | Updated: Feb 22, 2025, 11:23 AM IST
फराह खानकडून हिंदूंच्या भावना दुखावणारं विधान; पोलीस तक्रार दाखल! म्हणाली, 'होळी हा छपरी...'
(Photo Credit : Social Media)

Farah Khan Holi Remark : बॉलिवूड दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान विरोधात हिंदूंचा सण असलेल्या होळीवर अपमानास्पद कमेंट केली आहे. त्या कमेंटनंतर फराह खानवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. फराह खान विरोधात ही तक्रार हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकनं त्यांचा वकील अली आशिफ खान देशमुख यांच्याकडून ही तक्रार दाखल केली आहे. 

ताजा रिपोर्ट्सनुसार, 20 फेब्रुवारी रोजी छोट्या पडद्यावरील शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' च्या एका एपिसोड दरम्यान, फराहनं केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार शुक्रवारी खार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत हिंदुस्तानी भाऊनं दावा केला आहे की "फराहनं होळीला 'छपरि लोकांचा का सण' म्हटलं आहे. तिनं अशा एका शब्दाचा वापर केला आहे जो खरंच अपमानास्पद आहे. हिंदुस्तानी भाऊनं हे देखील म्हटलं की फराह खाननं केलेल्या या कमेंटनं त्याच्या धार्मिक भावनेला आणि त्यासोबत हिंदू लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत." 

वकील देशमुख याविषयी बोलताना म्हणाले की "माझ्या क्लायंटचं एकच म्हणणं आहे की फराह खानच्या या कमेंटनं हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान झाला आहे. पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी 'छपरी' या शब्दाचा वापर अत्यंत चुकीचा आहे आणि त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे."

तक्रारित म्हटलं आहे की 'माझ्या क्लायंटनं सांगितलं की फराहनं फक्त माझ्या भावना दुखावल्या नाहीत तर त्यासोबत मोठ्या प्रमाणात हिंदू समुदायाच्या देखील भावना दुखावल्या आहेत. या घटनेत फराह खानचा सहभाग आहे. एक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि कोरिओग्राफर ज्यांनी अलीकडेच होळी या सणाविरोधात अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह अशी कमेंट केली. ही तक्रार करत मी न्याय मागत आहे.'

हेही वाचा : 2 ऑक्टोबरचं रहस्य उलगडणार? Drishyam 3 येणार, मोहनलाल यांनी केली घोषणा

फराह खान विरोधात इतर काही कलमां अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये फराह खान ही परिक्षक म्हणून आहे. तर याच शोमध्ये तिनं होळी या सणाविषयी केलेल्या एका कमेंटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या या कमेंटला घेऊन सगळीकडे तिला ट्रोल करण्यात येत आहे.