Sanjay Raut On Raj Thackeray: वरळी मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. तसंच, 48 तासांत राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवणार, असंही ते म्हणाले होते. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तुम्ही अप्रत्यक्षपणे सत्तेतच आहात, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'हा भोंगा आम्ही गेले 20-25 वर्ष ऐकतो आहोत त्यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी शहांबरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहात म्हणजे सत्तेसोबतच आहात. तुमच्या हातात सत्ता येईल ना येईल हा पुढचा प्रश्न. पण एखादा पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेल्या 50-55 वर्षात कोणत्याही सत्तेशिवाय अनेक कार्यक्रम राबवले आहेत.'
राज ठाकरे यांनी भाषणात म्हटलं होतं की, सत्ता आल्यानंतर मी पोलिसांना मुंबई साफ करण्यास 48 तास देईन, त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मुंबई कशी साफ करणार? असा सवाल राऊतांनी केला आहे. सगळ्यात आधी मोदी-शहा, अदानींना साफ करा ते परप्रांतिय आहेत. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. यांनीच मुंबई नासवली आहे. मुंबई हातातून काढून घेण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. पण दुर्दैवाने राज ठाकरे मोदी-शहांना मदत करत आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे.
भुजबळ काय म्हणत आहेत किंवा प्रफुल्ल पवार काय म्हणत आहे प्रताप सरनाईक काय म्हणत आहेत भावना गवळी काय म्हणत आहेत त्याला आता काही अर्थ नाही हे सगळे एकनाथ शिंदे सह अजित पवार यांच्यापासून सगळे हे पक्ष सोडून गेले आहेत ते ईडी पासून बचाव करण्यासाठी स्वतःचा कातडी वाचवण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपमध्ये जातात प्रफुल पटेल यांची इस्टेट मोकळी झाली नसती भाजपमध्ये जातात इतर अनेकांच्या प्रॉपर्टी मोकळ्या झाल्या नसत्या आणि सध्या तरी ई डी आणि सीबीआयच्या फायली बंद करून कपाटात ठेवल्या नसत्या, असं त्यांनी म्हटलं आहे.
जिथे माझे उमेदवार असतील तिथे माझ्या पाठीशी उभे राहा. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर परत तर राज ठाकरे नाव सांगणार नाही. जर अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर खाकीवाल्यांना ऑर्डर देईन. ते रझा अकादमीचा बदला घेतील, असं राज ठाकरे यांनी वरळीच्या सभेत म्हटलं होतं.