Rajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 13, 2025, 05:11 PM IST
 Rajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका title=

Rajan Salvi Shivsena :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. भाजपला चकवा, ठाकरेंना धक्का देत राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसनेते प्रवेश केला आहे. ठाणे येथे राजन साळवी यांच्या भव्य पक्ष प्रेवश झाला. राजन साळवी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवधनुष्य हाती घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. 

शिवसेनेच्या फुटीनंतरही राजन साळवी यांनी ठाकरेंना खंबीर साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजन साळवी यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या  मागील काही काळापासून एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात राजन साळवी अडकले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र भाजपमध्ये न जाता साळवी हे शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबतच भाजपला धक्का दिल्याची चर्चा आहे. 

शिवसनेते पक्ष प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया

महायुतीत असताना मला मंत्रीपद मिळेल असं वाटलं होते. पण, विनायक राऊत यांच्यामुळे माझे मंत्रीपद हुकले असा गौप्यस्फोट राजन साळवी यांनी केला. तर, शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काम करेगा वही राजा बनेगा असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांचे स्वागत केले.