Vicky Kaushal Visits Mahakumbh: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या 'छावा' चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'छावा' चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाची कलाकार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
नुकताच अभिनेता विकी कौशल चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महाकुंभात पोहोचला आहे. महाकुंभात पोहोचलेल्या अभिनेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर मी खूप भाग्यवान आहे असं विकी कौशल म्हणाला. अनेक दिवसांपासून विकी कौशल येथे येण्यासाठी वाट पाहत होता.
'मी खूप भाग्यवान आहे'
प्रयागराज येथील महाकुंभात पोहोचल्यानंतर विकी कौशलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, इथे येऊन खूप छान वाटले. आम्हाला इथे कधी येण्याची संधी मिळेल याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. इथे आल्यानंतर मी खूप भाग्यवान आहे की आपणही महाकुंभाचा भाग बनत आहोत असं तो म्हणाला.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh | Actor Vicky Kaushal visits Mahakumbh 2025. pic.twitter.com/GrnSQtVnkO
— ANI (@ANI) February 13, 2025
'छावा' चित्रपटाच्या यशासाठी विकी कौशल आजकाल अनेक मंदिरांना भेट देत आहे. देव दर्शन करत आशीर्वाद घेत आहे. बुधवारी विकी आणि रश्मिका मंदान्ना शिर्डीतील साईबाबा मंदिरात गेले होते. जिथे दोघांनीही साईबाबांचे दर्शन घेतले. शिर्डीचे फोटोही अभिनेत्याने शेअर केले. याआधी देखील अभिनेत्याने अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि वेरूळ लेण्यांजवळील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. याचे देखील फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
'छावा' चित्रपटाचे बजेट
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. हा चित्रपट 160 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमधून देखील चांगली कमाई करत आहे. आता 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकेल का हे पाहावे लागेल.