लहानपणीची आणखी एक आठवण खराब, 'हेरा फेरी' चित्रपट ओरिजनल नव्हे; निघाला कॉपी

Hera Pheri is Copy of This Movie : 'हेरा फेरी' हा चित्रपट देखील आहे 'या' मल्याळम चित्रपटाचा कॉपी...

दिक्षा पाटील | Updated: Feb 13, 2025, 07:03 PM IST
लहानपणीची आणखी एक आठवण खराब, 'हेरा फेरी' चित्रपट ओरिजनल नव्हे; निघाला कॉपी  title=
(Photo Credit : Social Media)

Hera Pheri is Copy of This Movie : बॉलिवूडनं आजवर आपल्याला अनेक चित्रपट दिलेत ज्यांनी आपल्या मनात घर केलं आहे. त्यातही काही रोमॅन्टिक, क्राईम थ्रिलर, सस्पेन्स आणि कॉमेडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट होऊन गेलेत. त्यात अनेक चित्रपट हे कल्ट सिनेमा ठरलेत. असाच एक चित्रपट म्हणजे 'हेरा फेरी' . 'हेरा फेरी' या चित्रपटाची क्रेझ काही झाली तरी कमी होणार नाही. आजही टिव्हीवर हा चित्रपट लागला तरी सुद्धा प्रेक्षक हे टिव्हीसमोर बसून आनंदानं सह-कुटुंब हा चित्रपट पाहतात. पण तुम्हाला एक गोष्ट ऐकूण आश्चर्य होईल की हा चित्रपट ओरिजनल नाही. हा चित्रपट देखील कॉपी करण्यात आला आहे. 

बॉलिवूडवर गेल्या अनेक दिवसांपासून रिमेकचे आरोप होत आहेत. पण आता नाही तर याधी देखील असे अनेक चित्रपट येऊन गेलेत. जे रिमेक होते आणि त्याविषयी कोणाला कधी कळलं ही नाही. त्यापैकीच 'हेरा फेरी' हा एक चित्रपट आहे. 'हेरा फेरी' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट रामजी राव स्पिकिंगचा रिमेक आहे. महत्त्वाचं म्हणजे 'रामजी राव स्पिकिंग' हा चित्रपट देखील 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपट द मॅन रणवर आधारीत आहे. 

'रामजी राव स्पिकिंग' या चित्रपटातून घेतलेला हा जो चित्रपट आहे. हा 'हेरा फेरी' च्या फ्रॅन्चायझीचा पहिला चित्रपट आहे. दोन भाडेकरूंच्या अवती-भोवती फिरणारा हा चित्रपट अर्थात राजु आणि श्याम. त्यासोबत घरमालक यांच्यात असलेल्या मजेशीर संभाषण आणि मस्तीवर आधारीत आहे. तर घरमालक अर्थात बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. कशा प्रकारे एका भाडेकरू, राजू आणि श्याम आणि त्यांचे घरमालक यांना पैशांची नितांत गरज असते. त्यांना क्रॉस-कनेक्शनद्वारे खंडणीचा फोन येतो आणि ते स्वतःसाठी खंडणी मागण्याची योजना आखतात.

हेही वाचा : लहानपणी खळखळून हसवणारा शाहिद कपूरचा 'चुप चुप के' ओरिजनल नाहीच, 'या' चित्रपटाची डिट्टो कॉपी!

हा चित्रपट 31 मार्च 2000 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला तेव्हा संमिश्र रिव्ह्यु मिळाला होता. तर अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी केलेल्या अभिनयाची सगळ्यांकडून स्तुती करण्यात आली होती. या चित्रपटातून अक्षय कुमारची कॉमेडी बाजू किंवा अक्षयची कॉमेडी टायमिंग सगळ्यांना माहित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 21.4 कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाचं बजेट हे 7.5 कोटी होती. त्यानंतर 2006 मध्ये 'हेरा फेरीचा' सिक्वल प्रदर्शित झाला.