'इंडियाज गॉट लँटेंट' वरुन सध्या वाद निर्माण झालेला असताना रॅपर रफ्तार याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपण दुसऱ्याच्या अपयशात आनंद का शोधतो यामागील कारणांचा उलगडा केला आहे. त्याने पोस्ट शेअर करताना कॉमेडियन समय रैना किंवा रणवीर अलाहबादिया यांचा उल्लेख केलेला नाही. पण त्याची ही पोस्ट इंडियाज गॉट लँटेंटवरुन सुरु असलेल्या वादाशी संबंधित आहे असं दिसत आहे.
रफ्तार आणि समय रैना एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्याने त्याच्या पोस्टमध्ये दुसऱ्यांच्या अपयशाचा आनंद साजरा करण्यामागील मानवी मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. 36 वर्षीय रफ्तारने पोस्टमध्ये 'स्केडनफ्र्यूडच्या मानसशास्त्रा'बद्दल सांगितलं आहे. "लोकांना यशस्वी व्यक्तींना अपयशी होताना पाहणे अनेकदा आवडते", असं त्याने लिहिलं आहे.
1. सांस्कृतिक आकर्षण: आपण सेलिब्रिटी आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक करतो पण जेव्हा ते अडखळतात तेव्हा लगेच त्यांना जज करण्यास तत्पर असतो. ही पद्धत प्राचीन मिथकांपासून ते आधुनिक माध्यमांपर्यंत इतिहासात अस्तित्वात आहे.
2. मीडियाचा प्रभाव: मीडिया घोटाळ्यांना खळबळजनक बनवून, आपली उत्सुकता आणि इच्छा जागृत करून हे वाढवते.
३. शॅडेनफ्रूडचे मानसशास्त्र: इतरांच्या दुर्दैवाने आपल्याला मिळणारा हा आनंद आहे. हे घडते कारण:
सामाजिक तुलना: यशस्वी लोकांना अपयशी होताना पाहून आपल्याला आपल्या स्वतःच्या दोषांबद्दल बरे वाटते.
मत्सर आणि दिलासा: जेव्हा आपण ज्यांचा हेवा करतो ते पडतात तेव्हा ते तात्पुरते आपला राग कमी करते.
न्यायाची भावना: जेव्हा गर्विष्ठ किंवा नैतिकदृष्ट्या दोषपूर्ण व्यक्तींना परिणामांना तोंड द्यावे लागते तेव्हा समाधान वाटते.
रफ्तारने माणसाच्या वागणुकीतील कारणांची यादी मांडली आहे. त्याने लिहिलं आहे की, जीवनात एखाद्याला अपयशी होताना पाहून आनंद मिळणे हे स्वतःच्या 'असुरक्षितते'तून देखील येऊ शकते. "आपण असे का वाटते यावर विचार करणं योग्य आहे, ते न्यायाबद्दल आहे की आपल्या स्वतःच्या असुरक्षिततेला शांत करते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य आहे," असा निष्कर्ष त्याने काढला आहे. रफ्तारने इंडियाज गॉट लँटेंटच्या पहिल्या एपिसोडला उपस्थिती लावली होती.
दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर समय रैनाने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन इंडियाज गॉट लँटेंटचे सर्व व्हिडीओ हटवले आहेत.
रैना, अलाहबादिया आणि इतर 28 जणांवर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्यांच्या यूट्यूब कॉमेडी शोद्वारे अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे.