Vitamin Deficiency: उंची वाढण्यासाठी योग्य पोषण आणि जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. बालपण आणि किशोरवयीन काळात शरीराची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक पोषकतत्त्वे मिळणे गरजेचे असते. परंतु, काही वेळा विशिष्ट जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे उंची वाढण्याची प्रक्रिया प्रभावित होते.
शास्त्रीय अभ्यासानुसार, 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे उंची वाढ थांबू शकते. व्हिटॅमिन डी हाडांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असते कारण ते कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शोषणास मदत करते. जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, तर हाडे कमजोर होतात आणि उंची वाढण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.
हाडांच्या योग्य वाढीस मदत करते
हाडे आणि स्नायू बळकट होण्यासाठी आवश्यक
इम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) वाढवते
शरीरात कॅल्शियमची पातळी संतुलित ठेवते
1. सूर्यप्रकाश: सकाळच्या सूर्यप्रकाशात 15-20 मिनिटे बसल्याने शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते.
2. आहार : दुध, दही, चीज, अंडी, मासे, बटाटे, मशरूम आणि बदाम यांसारख्या अन्नपदार्थांमधून व्हिटॅमिन डी मिळते.
3. पूरक आहार (सप्लिमेंट्स): डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिन डीच्या गोळ्या किंवा सिरप घेतले जाऊ शकतात.
इतर कारणांमुळेही उंची वाढ थांबू शकते ती कोणती कारणं आहेत त्या विषयी जाणून घेऊया.
1. चुकीचा आहार आणि पोषणतत्त्वांची कमतरता
2. आनुवंशिक कारणे (आई-वडिलांची उंची कमी असल्यास)
3. कमी झोप किंवा तणाव
4. शारीरिक हालचालींचा अभाव
5. उंची वाढण्यासाठी हे उपाय
6. प्रथिनयुक्त आणि पोषक आहार घ्या
7. नियमितपणे योगा आणि व्यायाम करा
8. पुरेशी झोप घ्या
9. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा
10. जर तुमची उंची वाढ थांबत असेल आणि तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचा संशय असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)