Petrol-Diesel Price on 2 May 2023 : आजचा (2 मे 2023) दिवस सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारा दिवस ठरले असं वाटतंय. कारण सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवे दर जाहीर केले आहेत. पण, दिलासा देणारी बाब म्हणजे इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. 21 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने वाहन इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) उत्पादन शुल्क कमी केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. यामध्ये बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी स्वस्त होऊन 108.90 रुपये आणि डिझेल 23 पैशांनी स्वस्त होऊन 95.57 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर छत्तीसगडमध्येच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 47 पैशांनी घट झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 1 रुपये आणि डिझेल 78 पैशांनी स्वस्त झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल 41 पैशांनी वाढून 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांवर पोहोचले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या दरात बदल झाले तर काही भागात पेट्रोल स्वस्त दरात विकले जाणार आहे. यामध्ये अहमदनगर पेट्रोल 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांनी विकले जाणार आहे. तर अमरावती पेट्रोल 106.82 रुपये तर डिझेल 93.35 रुपये, कोल्हापूर पेट्रोल 106.75 रुपये तर डिझेल 93.28 रुपये, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये, नाशिक पेट्रोल 106.12 रुपये तर डिझेल 92.64 रुपये, पुणे 105.91 रुपये तर डिझेल 92.43 रुपये, रायगड 106.14 रुपये तर डिझेल 92.63 रुपये, रत्नागिरी 107.85 रुपये तर डिझेल 94.33 रुपये, ठाणे 105.64 रुपये तर डिझेल 92.24 रुपयांनी विकले जाणार आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते.
पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे नवे दर एसएमएसद्वारेही चेक करु शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.