EXCLUSIVE: 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट

Namdev Shastri Exclusive: धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला खूप त्रास होतो, जगू नये असं वाटत होतं असं महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 31, 2025, 09:44 PM IST
EXCLUSIVE: 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट title=

Namdev Shastri Exclusive: मी धनंजय (Dhananjay Munde) यांचा चेहरा आणि हाताला सलाईन लावलेलं पाहिलं. सलाईनसह ती व्यक्ती भगवानगडावर येते आणि डॉक्टर त्याला सलाईन लावतात. एका संताच्या ह्रदयाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? अशी विचारणा महंत नामदेव शास्त्री (Mahanat Namdev Shastri) यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी भगवानगडावर दाखल झाले होते. यानंतर पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला. 'झी 24 तास'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपल्या भूमिकेमागील कारणांचा उलगडा केला आहे.

"53 दिवस झालं तो माणूस आघात सहन करतो. त्याच्या हाताला सलाईन आहे, त्याची मानसिक अवस्था ठीक नाही, चेहरा मला पाहवात नाही. एका छोट्या वाक्यावरुन इतकं रान उठलं आहे. धनंजय यांची काय मानसिक हत्या करायचा विचार आहे का? त्याने किती सहन करावं? 53 दिवस झाले सहन करत आहे. हंबरडा फोडतोय तरी कोणी पाहत नाही. मी जरा त्यांच्यासाठी बोललो आणि सगळे तुटून पडत आहेत. हत्येचं समर्थन नाही तर एका व्यक्तीला समर्थन असून, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत," असं त्यांनी स्पष्ट केलं. 

EXCLUSIVE: धनंजय मुंडेंना पाठिंबा द्यावासा का वाटला? नामदेव शास्त्रींनी केला खुलासा

 

"किती सोसावं, वय झालं ना आता. पन्नाशी गाठत आल्यानंतरही धनजंय टाकेचे घावत सोसत आहेत. दया येत नाही, फक्त प्रेम अभिव्यक्त केलं आणि त्याचं इतकं राजकारण होईल असं वाटलं नव्हतं," असं नामदेव शास्त्रींनी सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात नेमकं काय दिसलं? असं विचारलं असता ते म्हणाले की, "मला खूप त्रास होतो, जगू नये असं वाटत होतं. मी त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा केली. त्यांना समजून सांगितलं, धीर दिला. तुम्ही नीट पाहिलं तर हाताला सलाईनची सुई लावली होती आणि त्यातून रक्त येत आहे. समाजाने, राजकारणाने इथपर्यंत जीव घ्यावा हे मला पटत नाही".

'धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं विधान, म्हणाले 'हा विषय...'

नेमकी काय चर्चा झाली? या प्रश्नावर ते म्हणाले की, "अडीच तास चर्चा झाली. अर्जुनाचं महत्वाचं काय, अर्जुन पण निराशेत गेला होता. कृष्णाने कसं कर्तव्य कर्म करण्यास भाग पाडलं हे समजावून सांगितलं. त्याची मानसिकता मजबूत केली. भगवानगडावर पहिल्यांदा त्यांना शांत झोप लागली. 53 दिवसांत पहिल्यांदा शांत झोपले. मी डोळ्याने पाहिल्यानंतर भगवानगड पाठीशी आहे म्हटलं. याचं फार मोठं राजकारण करु नये असं वाटतं. माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावू नये. दोषी दोषी असतो. मी पाठिंबा दिला म्हणून न्यायालय सोडत नाही".