Mahant Namdeo Shastri Exclusive Interview: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हायला हवी. ते न्यायालयाचे काम आहे. हत्येचे समर्थन मी करत नाही. धनंजय मुंडे यांचे समर्थन करतोय हे माझी व्यक्तिगत आणि भगवान गडाची भूमिका आहे. भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. हे दोन्ही विषय वेगळे आहे. मला वाटत धनजंय मुंडे निर्दोष आहेत, म्हणून मी त्यांची पाठराखण करतोय. आरोपी पकडले आहेत. त्यांची चौकशी होईल आणि निकाल लागेल. हे कोणी थांबवू शकत नाही. धनंजयचे राजकीय व्यक्तीमत्व आहे. त्याच्या आजुबाजूला अनेकजण असतात. त्यामुळे धनंजय मुंडेना दोषी ठरवता येणार नाही, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या मागे धर्मसत्तेची ताकद उभी केली जातेय. यामुळे तुम्हालाही समर्थन मिळत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मुंडेंचे सामाजिक कार्य मी पाहीले आहे. विवाहाने संसार उभे करताना आम्ही पाहिल्याचे ते म्हणाले.
हा मुद्दा राजकीय आहे. तुम्ही या राजकारणाचा भाग बनताय असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
भगवान गडावर राजकारण होणार नाही. पाठींबा देणं म्हणजे राजकारण नाही. भगवान गड सामाजिक, अध्यात्मिक आहे. एका व्यक्तीला मी सहकार्य करतोय. चांगल्या मतांनी निवडून आलेल्या नेत्याला मी समर्थन करतोय. सामान्य लोकांना काही समजत नाही म्हणून ज्ञानेश्वरी समजून सांगावी लागते. एका भक्ताच्या पाठीमागे गड उभं राहणं याला तुम्ही राजकीय मुद्दा म्हणताय, असे महंत शास्त्री म्हणाले.
माझ्या पाठींब्याने न्यायव्यवस्थेच्या निर्णयावर परिणाम होणार नाही. भगवान गडाला वाटतं त्यांना पाठींबा द्यावा. वाल्मिक कराड हा पोलीस यंत्रणेचा भाग आहे. धनंजय मुंडेंचं खासगी आयुष्य हे त्यांचं आहे. मला इतर कशाबद्दलही बोलायच नाही. मी सगळ्यांना ओळखतो. संत असंत गडावर सर्वच येतात. धनंजयला माझा पाठींबा आहे, यावर महाराष्ट्राने राजकारण करु नये. हत्येच्या आरोपींना फाशी व्हावी. धनंजय दोषी ठरत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यासोबत आहोत, असे नामदेव शास्त्री म्हणाले.
आमच क्षेत्रच शिव्या खाण्याचं आहे. जगामध्ये जो ज्ञानी, श्रीमंत होतो,तो वैराला कारणीभूत ठरतो. मला जे भेटायला येणार त्या सर्वांना मी भेटणार. संतोष देशमुखच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भगवान गड उचलेल, असे नामदेव शास्त्री म्हणाले.
धनंजय मुंडे आणि माझ्यात अडीच तास चर्चा झाली. धनंजय मुंडेंच्या हाताला सलाइन होती. मी त्यांना मानसिकरित्या मजबूत केले. यानंतर त्यांना शांत झोप लागली.