MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प! नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर

सकाळी मुंबईत कामाला येणारे पुणेकर सध्याकाळी चहा घ्यायला घरी जाऊ शकतात. MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर उभरला जाणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 17, 2025, 10:16 PM IST
 MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प! नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर

Elevated Corridor Project Palaspe: मुंबई आणि पुणेकरांच्या सोईसाठी MMRDA ने 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंर्तग  मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर उभारला जाणार आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेशी जो़डेल जाणार आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई पुणे असा अप डाऊन प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना याचा फायदा होणार आहे. 

मुंबई आणि पुणे ही फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील दोन महत्वाची शहरं आहेत. अनेक पुणेकर सध्या नोकरी व्यवसाच्या निमित्ताने दररोज मुंबई पुणे असा प्रवास करतात. तर, अनेक मुंबईकर देखील नोकरीच्या निमित्ताने पुण्यात ये जा करतात. मात्र, हाच मुंबई पुणे प्रवास अनेकांना नकोसा वाटतो.  ट्रेनने प्रवास केला तर वेळ वाचतो. मात्र, ट्रेन चुकली की प्रवासाचे सगळं नियोजन बिघडते. तर, कधी कधी रेल्वेचा खोळंबा झाला तर प्रवासी अनेक तास अडकून पडतात. तर, बाय रोड जायचे असेल तर, चार तासांचा वेळ लागतो. मुंबई पुणे प्रवास अधिक जलद आणि सुखकर व्हावा यासाठी  मुंबई महानगर प्राधिकरण महामंडळ अर्थात MMRDA ने 1100 कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे.  

MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा नव्याने तयार झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर सी-लिंक अर्थात MTHL  जोडला जाणार आहे. यासाठी दोन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारले जामार आहेत. यासाठी जमीन अधिग्रहण व इतर बाबींची पूर्तता केली जात आहे. 2027 पर्यंत हा मुंबई पुणे असा स्पेशल एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे संजय मुखर्जी यांनी सागितले. 

या प्रकल्पाअंतर्गत दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत.  मुंबई ट्रान्स हार्बर सी-लिंकवरच्या चिरळेपासून गव्हाण फाट्यापर्यंतचा भाग एका कॉरिडॉरने जोडला जाणार आहे. 4 हजार 958 मीटर इतक्या लांबीचा हा कॉरिडॉर असेल. तर, दुसरीकडे पळस्पे फाट्यापासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दुसऱ्या कॉरिडॉरने जोडला जाणार आहे.  या कॉरिडॉरची लांबी 1700 मीटर असेल. हे दोन्ही कॉरिडॉर प्रत्येकी 6 मार्गिकांचे असणार आहेत.

जेएनपीटी-पनवेल नॅशनल हायवे या महामार्ग क्रमांक 348 वर चिरळे ते गव्हाण फाटा यादरम्यान बांधल्या जाणाऱ्या कॉरिडॉर प्रकल्पात सर्व्हिस रोडची पुनर्बांधणी देखील केली जाणार आहे.  रायगड जिल्ह्यातील जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर बांधल्या जाणाऱ्या दुसऱ्या कॉरिडॉर उभारणीदरम्यान महामार्गाचे रुंदीकरणही केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे महामार्ग क्रमांक 348 वर होणारी वाहतूक कोंडी टाळता येणार असल्याचा दावा मुखर्जी यांनी केला आहे. 

हे देखील वाचा... नवी मुंबईतील श्रीमंत एरिया; इथं राहतात करोडपती बिल्डर आणि व्यावसायिक