तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरताय? त्याआधी वाचा 'ही' बातमी; नागपुरात धक्कादायक घटना

नागपूरमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकित कंपनीच्या डब्ब्यांमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा काळा धंदा नागपूर पोलिसांनी उघड केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 17, 2025, 10:14 PM IST
तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरताय? त्याआधी वाचा 'ही' बातमी; नागपुरात धक्कादायक घटना

आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. जेवणात आपण कोणतं तेल वापरतो त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. त्यासाठी चांगल्यात चांगला तेल वापरण्याकडे आपला कल असतो. मात्र तुम्ही नामांकित कंपनीचं म्हणून घेतलेलं ते खरंच त्या कंपनीचं आहे का? असं आम्ही का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडेल. याचं कारण म्हणजे. नागपूरमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकित कंपनीच्या डब्ब्यांमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा काळा धंदा नागपूर पोलिसांनी उघड केला आहे. 

नागपूरमध्ये ब्रँडेड तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त तेल विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण अन्नपदार्थांमध्ये उत्तम दर्जाचं तेल वापरतो. मात्र या अशा प्रकारांमुळे सर्वसामान्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. नागपूरमधील कारखान्यावर छापा टाकत क्राईम ब्रांच आणि हुडकेश्वर पोलिसांनी भेसळयुक्त तेलविक्रीचा प्रकार उघडकीय आणला आहे.

तुमच्या जेवणात भेसळयुक्त तेल? 

- भेसळयुक्त तेल खुल्या डब्ब्यात भरलं जायचं

- डब्ब्यावर ब्रँडेड तेलाचं स्टिकर लावून विक्री

-हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील समतानगरमध्ये कारखाना

- निकृष्ट दर्जाचं किंवा वापरलेलं तेल विकलं जात असल्याचा संशय

- निलेश साहू नावाच्या आरोपीला अटक

- 8 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून हा भेसळयुक्त तेल विक्रीचा प्रकार सुरू होता. त्यामुळे नागपूरकरच चांगलेच धास्तावलेत. कधीपासून विक्री केली जातेय?, हे तेल कुठून आणलं जायचं याची पोलिसांकडून माहिती घेतली जातेय.काही पैसे कमवण्यासाठी सर्वसामान्यांच्या जीवाशी अशाप्रकारे खेळ केला जातोय. त्यामुळे या आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.