महाराष्ट्रात सध्या गिया बार्रे या आजारामुळे सर्व जण घाबरले आहेत. महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या वाढत असून एकाचा मृत्यूमुळे सर्व जण चिंतेत आहे. खरं तर हिवाळा असो किंवा उन्हाळा घरात छोटे मोठे आजार हे सुरु असतात. सर्दी, खोकला, पोटदुखी हे साधणार आपल्याला पाहिला मिळतात. त्यात घरात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं असेल तर आपल्या त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमकुवत असते. अशा स्थितीत त्यांना वातावरणातील बदलामुळे सहज आजाराची लागण होतं.
पण प्रत्येक आजारासाठी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो खरं, पण काही सामान्य आजारांवर घरगुती उपाय खूप फायदेशीर असतात. आयुर्वैदात असे अनेक उपचार सांगण्यात आले आहेत. आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेले हे घरगुती उपाय लहान-सहान आरोग्य समस्यांचे झटपट समाधान करतात. सर्दी-खोकला, पोटात गॅसचा त्रास अशा समस्या नेहमी त्रास देतात. विशेषतः ज्या घरात लहान मुले असतात, तिथे ही समस्या जास्त भासत असते. कारण हवामान बदलले की, लहान मुलांचे आरोग्य लवकर बिघडते.
लहान मुलांना प्रत्येक वेळी औषध देणे योग्य नाही. अनेकदा औषध उपलब्ध नसते किंवा डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही. अशा वेळी घरगुती उपाय मदतीला येतात. हे घरगुती उपाय आपण नैसर्गिक वस्तूपासून बनवतो, त्यामुळे याचा शरीरावर काही विपरीत परिणाम होत नाही.
सर्दीमुळे लहान मुलांचं नाक बंद होते, ज्यामुळे त्यांना दूध पिण्यात आणि झोपण्यात अडचण येते. यासाठी ओव्याची पुरचुंडी हा एक उत्तम उपाय आहे.
1. ओवा
2. तिळाचे तेल
तिळाच्या तेलाची एक-एक थेंब मुलाच्या नाकात टाकल्याने देखील नाक सहजपणे उघडते.
लहान मुलांना पोटात गॅस झाल्यास खालील उपाय करू शकता.
1. हिंग आणि कोमट पाणी
एक चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून मुलाला द्या. तसेच मुलाच्या नाभीवर हिंगाचे पेस्ट लावा.
2. हिंग आणि दूध
दूधामध्ये एक चिमूटभर हिंग मिसळून मुलाला द्या.
3. पानाचा काढा
लहान मुलांना सर्दीमुळे कफ जमा होऊन छातीत जडपणा जाणवतो. अशा वेळी खालील तेलाचा वापर फायदेशीर ठरतो.
हे ही वाचा: किचनमधील 'हे' पदार्थ आता कधीच खराब होणार नाही; फक्त 'या' पद्धतीने ठेवा साठवून1. तिळाच्या तेलाचे मिश्रण
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)