Sunil Shetty Upcoming Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी सध्या 'हेरा फेरी 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याआधीच्या 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षक आता तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत, सुनील शेट्टीने त्याच्या करिअरविषयी काही रंजक गोष्टींचा खुलासा केला. त्याने सांगितले की सुरुवातीच्या काळात तो एकाच वेळी तीन चित्रपटांची शूटिंग करायाचा.
सुनील शेट्टीने त्याच्या संघर्षा काळाचा उल्लेख करताना सांगितले की, "मी अॅथलीट असल्यामुळे मला अपयश हिच यशाची पहिली पायरी असते हे माहित होत. त्यामुळे मी मेंटली डिप्रेस झालो नाही. पण, या क्षेत्रात खूप निराशा अनुभवली. जेव्हा 'बलवान' रिलीज झाला, तेव्हा मी आधीच 40 चित्रपट साइन केले होते. त्या काळात आम्ही कित्येक चित्रपटांची शुटींग एकाच दिवशी करयचो."
सुनीलने पुढे सांगितले, “प्रह्लाद कक्कड यांनी मला साइन केले. माझा पहिला चित्रपट होता 'आरजू'. या चित्रपटाचे शूटिंग पूर्णच होत आले हते, पण शेवटी काही अडचणी आल्या आणि चित्रपट थांबवावा लागला. त्यानंतर त्यांनी 'एक और फौलाद' नावाचा दुसरा चित्रपट जाहीर केला. तो हिट झाला आणि ते म्हणाले की आता नवीन हिरोसोबत काम करणार नाही. त्याच दरम्यान 'वक्त हमारा है' आणि 'बलवान' हे चित्रपट एकत्र आले आणि तिथून माझ्या करिअरची खरी सुरुवात झाली."
सुनील शेट्टीने अभिनयाची सुरुवात 90च्या दशकात 'बलवान' या चित्रपटातून केली होती. पण त्याआधीच सुनीलने 40 चित्रपट साइन केले होते, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. एका पॉडकास्टमध्ये कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्यासोबत बोलताना त्याने हा खुलासा केला होता.
सुनील शेट्टी म्हणाला, “माझ्या मार्शल आर्ट्स ट्रेनिंग दरम्यान मला काही चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. एकापाठोपाठ एक चित्रपट सुरू होत होते, पण काही अडचणींमुळे बरेच चित्रपट अर्धवट राहिले. जेपी दत्तांनी माझे फोटो रिलीज केले आणि मोठे पोस्टर्स लावले. हे पोस्टर्स पाहून अनेक निर्मात्यांनी मला संपर्क केला."
हे ही वाचा: 34 मुली दत्तक घेणारी, अंडरवर्ल्डविरुद्ध आवाज उठवणारी 'ही' टॉपची अभिनेत्री आहे तरी कोण?
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी' मालिकेत 'श्याम' या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर एक खास ठसा उमठवला आहे. त्यामुळे तिसऱ्या भागात त्याला पुन्हा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतेच डायरेक्टर प्रियदर्शन यांनी कळवले की, 'हेरा फेरी 3' वर लवकरच काम सुरू होईल'. सुनील शेट्टीचा अभिनय प्रवास हा मेहनत, चिकाटीचा उत्तम उदाहरण आहे. त्याच्या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. तो पुन्हा एकदा स्वतःच्या अभिनयाद्वारे चाहत्यांना भुरळ घालणार, यात शंका नाही.