'मी तेव्हा व्हर्जिन होते आणि...', 'त्या' फोटोशूटवर ममता कुलकर्णीने सोडलं मौन, म्हणाली, 'मला शारीरिक संबंधांबद्दल...'

सध्या अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर प्रकरणामुळे चर्चेत आहे. अशात अभिनेत्रीनेनुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. यासोबतच ममताने 90 च्या दशकातील तिच्या सेमी न्यूड फोटोशूटबद्दलही तिने मौन सोडलं. 

नेहा चौधरी | Updated: Feb 2, 2025, 04:56 PM IST
'मी तेव्हा व्हर्जिन होते आणि...', 'त्या' फोटोशूटवर ममता कुलकर्णीने सोडलं मौन, म्हणाली, 'मला शारीरिक संबंधांबद्दल...' title=

भारतात अनेक वर्षांनी परतलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी चर्चेत आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवलं आहे. महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून ममता हिची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयावर अनेक साधू संतांनी आक्षेप घेतला होता. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या निर्णयामुळे किन्नर आखाड्यात फूट पडली आणि किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममतला महामंडलेश्वर पदावरुन हटवलं. तर दुसरीकडे 90 च्या दशकातील या अभिनेत्रीने सलमान खानपासून शाहरुख खान, अक्षय कुमारपर्यंत अनेक बड्या स्टार्ससोबत केलंय. अशातच ती गेल्या काही दिवसांपासून चर्च आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक खुलासे केलंय. यासोबतच ममताने 90 च्या दशकातील तिच्या सेमी न्यूड फोटोशूटवरही मौन सोडलंय.

तू टॉपलेस का पोज दिलीस?

ममता कुलकर्णी नुकतीच 'आपकी अदालत' या टीव्ही शोमध्ये दिसून आला. यावेळी पत्रकार रजत शर्मा यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. 'स्टारडस्ट' मासिकासाठी केलेल्या सेमी न्यूड फोटोशूटबद्दल रजतने विचारलं की, तू टॉपलेस पोज का दिलीस? यावर ममता कुलकर्णी म्हणाली की, 'स्टारडस्ट लोकांनी मला डेमी मूरचा फोटो दाखवला होता, जो मला अश्लील वाटला नाही. त्यावेळी मी अगदी निरागस होतो. मी नववीत शिकत असे. मी तेव्हाही व्हर्जिन असल्याचे विधानही केलं होतं. हे लोकांना पचवता आलं नाही. 

यानंतर ममता म्हणाली, 'मला शारीरिक संबंधांबद्दल माहिती नव्हती. जोपर्यंत तुम्हाला शारीरिक संबंधांबद्दल माहिती नाही तोपर्यंत तुम्हाला काही गैर वाटणार नाही. त्यामुळेच मला न्यूड फोटोशूटबद्दल काहीच माहिती नव्हती. मी 23 वर्षात एकही पोर्नोग्राफी व्हिडीओ पाहिला नाही यावर तुमचा विश्वास असेल का?

यानंतर रजतने ममताला त्यांच्या काही गाण्यांबद्दल प्रश्न विचारले. त्यांनी ममताच्या 'छट पर सोया था बहनोई' या गाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. यावर ममता म्हणाली, 'तुम्ही हा प्रश्न माधुरी दीक्षितला विचारा किंवा कोणत्याही डान्सरला, आम्ही फक्त डान्स स्टेप्सवर लक्ष केंद्रित करतो, डायलॉगवर नाही. आमचं संपूर्ण लक्ष आमच्या डान्स स्टेप्सवर असतात.