34 मुली दत्तक घेणारी, अंडरवर्ल्डविरुद्ध आवाज उठवणारी 'ही' टॉपची अभिनेत्री आहे तरी कोण?

'या' अभिनेत्रीला फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर स्वतःच्या धाडसी व्याक्तीमत्तवामुळेदेखील ओळखले जाते. हिने अंडरवर्ल्डचा डॉन छोटा शकीलविरुद्ध कोर्टात साक्ष दिली. जाणून घ्या ही धाडसी अभिनेत्री आहे तरी कोण?

Updated: Feb 2, 2025, 03:46 PM IST
34 मुली दत्तक घेणारी, अंडरवर्ल्डविरुद्ध आवाज उठवणारी 'ही' टॉपची अभिनेत्री आहे तरी कोण? title=

 Preity zinta: बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे, तिला फक्त तिच्या अभिनयामुळेच नव्हे तर तिच्या धाडसामुळेही ओळखले जाते. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री आजही तिच्या डिंपल स्माईलसाठी प्रसिद्ध आहे.या अभिनेत्रीचा करिअर जेवढा यशस्वी होता, तेवढाच तिचा व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात संघर्ष होता. वर्ष 2009 मध्ये तिने 34 मुलींना दत्तक घेतले. आजपर्यंत त्या मुलींच्या संगोपनाचा सर्व खर्च ती स्वतः उचलत आहे. सामाजिक कार्यात तिने कायम सक्रिय सहभाग घेतला आहे. एकदा तिने बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा मागितली होती. अभिनेत्रीने थेट त्यांना नपुंसक बनवण्याची मागणी केली होती.

तिचा पहिला चित्रपट शाहरुख खानसोबतचा 'दिल से' होता. यामध्ये मनीषा कोइरालाचीसुद्धा भूमिका होती. या चित्रपटानंतर ती हळूहळू प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. 'क्या कहना', 'कोई मिल गया', 'वीर-ज़ारा' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांनी तिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले.

कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री दुसरी कोण नाही तर 'प्रीती झिंटा' आहे. प्रीती झिंटाच्या जीवनात इतरही अनेक चढ-उतार आले. तिच्यावर तिच्या बॉयफ्रेंडने मारहाणीचे आरोप केले होते, तर दुसरीकडे एका अभिनेत्रीने घर फोडल्याचा आरोप केला होता. तरीही प्रीतीने कधीही हार मानली नाही. ती नेहमी स्वतःच्या मतांवर ठाम राहिली. एवढेच नाही तर प्रीती झिंटाची खरी धाडसाची कहाणी तेव्हा समोर आली, जेव्हा तिने अंडरवर्ल्डचा डॉन छोटा शकीलविरुद्ध कोर्टात साक्ष दिली.

'चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटात अंडरवर्ल्डच्या माणसांचे पैसे गुंतलेले होते, परंतु हे चित्रपटाच्या टीमला आधी माहिती नव्हते. जेव्हा ही गोष्ट उघड झाली, तेव्हा प्रीतीसह संपूर्ण टीमला धमक्या दिल्या जाऊ लागल्या. या सगळ्या दबावाखाली सगळ्यांनी माघार घेतली. पण प्रीती झिंटा एकटीच अशी होती जिने अंडरवर्ल्डविरोधात कोर्टात साक्ष दिली. या अपार धाडसासाठी तिला त्यावेळच्या गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते 'गॉडफ्रे फिलिप्स नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा: ना टायगर, ना कृष्णा, जॅकी श्रॉफ यांच्या मांडीवर बसलेल्या बाळाला ओळखलं का? 26 व्या वर्षी आहे 74 कोटींची मालकीण

खासगी आयुष्यातही प्रीतीने मोठा निर्णय घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे पुत्र शानदार अमरोही प्रीतीला मुलीप्रमाणे मानत होते. त्यांनी प्रीतीला त्यांच्या 600 कोटी रुपयांच्या संपत्तिची ऑफर दिली होती. पण प्रीतीने ती संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला आणि सांगितले की, "कोणीही माझ्या वडिलांच्या जागी येऊ शकत नाही." आज प्रीती झिंटा स्वतः 183 कोटी रुपयांची मालकीण आहे.