रशियन तरुणीच्या राड्यामुळे S*x रॅकेटचा भांडाफोड; एकाचा मृत्यू अन् 11 अटकेत

Crime News: पोलिसांनी या प्रकरणामध्ये 11 आरोपींना अटक केली असली तरी या आरोपींपर्यंत ते ज्या पद्धतीने पोहोचले तो घटनाक्रम फारच रंजक आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 13, 2025, 03:05 PM IST
रशियन तरुणीच्या राड्यामुळे S*x रॅकेटचा भांडाफोड; एकाचा मृत्यू अन् 11 अटकेत title=
पोलिसांनी 11 जणांना केली अटक

Crime News: छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी जिल्हामध्ये देहविक्रेय व्यवसायाशीसंबंधित 11 जणांना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून तेलीबांधा आणि सरस्वती नगर पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधून देहविक्रेय व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी नियोजपूर्वक पद्धतीने कारवाई केली. खरं तर या प्रकरणाबद्दल पोलिसांना एका विचित्र घटनेमुळे धागेदोरे मिळाले. 

या राड्यामुळे हाती लागले धागेदोरे

झालं असं की, 5 फेब्रुवारी रोजी येथील एका रस्त्यावर रशियन (मूळची उझबेगिस्तानी) तरुणीने प्रचंड ड्रामा केला. यामधूनच पोलिसांना देहविक्रेय व्यवसायासंदर्भात शंका आली. समोर आलेल्या माहितीनुसार, या परदेशी तरुणाने मद्यधुंदावस्थेत कार चालवताना तीन तरुण प्रवास करत असलेल्या दुचाकीला धडक देऊन पळ काढला होता. या अपघातामध्ये तिघेही जखमी झाले. या अपघातानंतर पोलीस हवालदार आणि स्थानिकांनी वाद मिळवण्यासाठी तरुणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने पोलीस हवालदार आणि स्थानिकांना उद्धट वागणूक दिली. आरेरावीच्या भाषेत ही तरुणी बोलत होती.

या तरुणीकडून मिळाली महत्त्वाची माहिती

यानंतर पोलिसांनी महिला सहकाऱ्यांच्या मदतीने या तरुणीला ता्यात घेतलं. या मुलीचा चौकशी केली असता पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली. ही महिला देहविक्रेय व्यवसायाशीसंबंधित असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या तरुणीच्या मदतीनेच पोलिसांनी या भागात मानवी तस्करीच्या माध्यमातून देहविक्रेय करणाऱ्या 11 जणांना अटक केली. 

एका तरुणाचा मृत्यू

रायपूरमधील व्हिआयपी रोडवरील ड्रामा आणि गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणावरुन लोकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप मित्तल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. मध्यरात्रीनंतर तेलीबांधा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या व्हिआयपी रोडवर ही आरोपी परदेशी तरुणी कार चालवत होती. ही तरुणी मद्यधुंदावस्थेत होती. तिने दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन तरुणांना धडक दिली. या अपघातात तिन्ही तरुण जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अरुण विश्वकर्मा नावाच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रायपूरमध्ये देहविक्रेय व्यवसाय

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देहविक्रेय व्यवसायासाठी वेगवेगळ्या राज्याबरोबरच परदेशी तरुणांना रायपूरमध्ये बोलवलं जातं. या अपघातानंतर देहविक्रेय करणाऱ्या टोळीचा सदस्य असलेला आरोपी जुगल कुमार फरार झाला होता. त्याला पश्चिम बंगालमधून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये उझबेकिस्तानी तरुणीबरोबरच एका तरुणालाही अटक केली आहे. या दोघांची नावं नोदिरा आणि भावेश अशी आहेत.