Mahakumbh 2025 Naga Sadhu : नागा साधू हे जेव्हा कुंभमेळ्याला कुंभ मेळ्यात पोहोचतात तेव्हा ते विशुद्ध नागा रुपात येतात. शरिराला भस्म लावतात. एकही वस्त्र ते परिधान करत नाहीत आणि त्रिशूळ घेऊन चालताना दिसतात. पण जेव्हा ते कुंभमेळ्यातून निघतात तेव्हा ते पुन्हा लंगोट परिधान करतात. त्या मागचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर आज आपण त्या विषयीच जाणून घेऊया...
खरंतर यंदाचा प्रयागराजमधील 2025 महाकुंभ असो किंवा या आधीच्या कोणत्याही कुंभमेळा असो तिथे नागा साधू हे आपल्याला दिसतात. यंदाच्या महाकुंभमध्ये तिसरं शाही स्नान केल्यानंतर नागा साधु हे त्यांच्या त्यांच्या अखाड्यात, हिमाचल किंवा इतर ठिकाणी तपस्या करण्यासाठी परतल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, जेव्हा तेव्हा कुंभमेळ्यात येतात तेव्हा त्यांच्या कपड्यांमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळते. जेव्हा यंदाच्या वर्षी 14 जानेवारीला पहिलं शाही स्नान झालं. तेव्हा सगळ्यात पुढे कोण होतं तर ते होते नागा साधु होते. ज्यांनी या संगमध्ये स्नान केलं आहे. त्यानंतर 29 जानेवारी रोजी दुसरं शाही स्नान आणि 3 फेब्रुवारी रोजी तिसरं शाही स्नानसोबत राहणार आहे. शाही स्नानमध्ये जेव्हा नागा साधू येतात तेव्हा ते देवानं दिलेल्या प्राकृतिक स्वरूप म्हणजेच नग्न राहतात. कोणत्याही प्रकारचे वस्त्र ते परिधान करणार नाही.
यंदाच्या महाकुंभ मेळाव्यानंतर नागा साधू हे आता परत 2027 मध्ये नाशिकमध्ये महाकुंभ मेळाव्यात दिसणार आहेत. त्यानंतर 2028 मध्ये उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमध्ये दिसतील. नागा साधू ज्या अखाड्यांशी जोडलेले असतात तिथे ते आपली संस्कृती आणि प्राचीन परंपरेचे पालन करतात. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का की जेव्हा नागा साधू हे कुंभ मेळाव्यात तिसरं शाही स्नान केल्यानंतर त्यांच्या अखाड्याला परततात तेव्हा ते एक वस्त्र परिधान करतात. जे सांसारिक जगात पुढे जाण्यासाठी महत्त्वाचं आहे.
जेव्हा नागा साधू हे सांसारिक जगासाठी निघतात. तेव्हा कपडे म्हणून ते काही परिधान करतात तर ती फक्त एक लंगोट असते. ती लंगोट बांधल्या नंतरच ते कुंभमेळा सोडतात. त्याच्या मागे आध्यात्मिक, सामाजिक आणि परंपरेची अशी कारण आहेत. नागा साधू हे कुंभमेळा आणि काही ठरावीक वेळी निर्ववस्त्र राहू शकतात पण सामान्य जीवनात त्यांना समाजाच्या काही मर्यादा असतात त्यांना पालन करण्याची गरज असते. त्यामुळे ते कमीत कमी किंवा लंगोट तरी परिधान करतात.
हेही वाचा : 'तोंड उघडलं तर...', रणबीर अलाहबादिया आणि समय रैनाच्या Controversy वर AR Rahman ची प्रतिक्रिया
अखाड्यांमध्ये नागा सांधूंसाठी काही कठोर नियम असतात. त्यापैकी एक नियम हा आहे की जेव्हा तुम्ही धार्मिक आयोजन, यात्रा किंवा कोणत्या सामाजिक ठिकाणी जातात तेव्हा तुम्ही लंगोट किंवा साधु वस्त्र परिधान करावेच लागतात. लंगोट फक्त एक वस्त्र नाही तर त्यांच्या आत्मसंयमचं एक प्रतीक आहे. हे नागा बाबांना या गोष्टीची आठवण करुन देतात की नागा बाबा हे सांसारिक सुख आणि भौतिक इच्छांपासून दूर आहेत आणि त्यांच्या आयुष्याचा एकच उद्देश्य आहे आणि तो म्हणजे साधना आणि तपस्या.