Mahaparinirvan Din 2024 : असं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटूंब; आज कोण काय करतात?

Dr Babasaheb Ambedkar Family Tree : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2024 रोजी आहे. बाबासाहेबांचं कुटूंब कसं होतं, त्यांच्या कुटुंबातील वंशवेल यानिमित्ताने पाहणार आहोत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 3, 2024, 06:33 PM IST
Mahaparinirvan Din 2024 : असं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटूंब; आज कोण काय करतात?  title=

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. भारतमातेच्या थोर सुपुत्राची पुण्यतिथी जगभरात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक, कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ आणि जगप्रसिद्ध विद्वान होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि ज्ञान जातीयवाद निर्मूलन आणि गरीब, दलित, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.

14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेब यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य आणि खालच्या जातीतील मानत होते. बाबासाहेब आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. समाजातील अस्पृश्यता, जातिवाद, भेदभाव यांसारख्या दुष्कृत्यांचा अंत करण्यासाठी त्यांनी अनेक चळवळीही केल्या.

(हे पण वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?) 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील राजकारणी होते जे सामाजिक कार्यात व्यस्त असूनही वाचन आणि लेखनासाठी वेळ काढत. आजच्या दिवशी बाबासाहेबांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या पुण्यतिथी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली जाते. अशा वेळी आपण त्यांच्या कुटुंबाची वंशावेळ जाणून घेऊया. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीचे होते. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांचा सर्वात लहान पुत्र भीमराव म्हणजे आपले डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

कुटुंब आता काय करतं? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आताची पिढी देखील राजकारणा सक्रीय आहेय  प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांच्याशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. एक मुलगी परदेशात शिकते तर एकीचे लग्न झालेले आहे. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत.