Railway Staions Stampedes: काल (15 शनिवारी) नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीमुळे सर्व हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत तीन लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाला असून 10 हून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. पण चेंगराचेंगरीची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर अशा दुर्घटना घडल्या आहेत.
एखाद्या विशेष दिवशीच नाही तर कित्येक वेळा फक्त काही अफवांमुळे लोकांमध्ये गोंधळ उडतो आणि या दुर्दैवी घटना घडतात. कित्येक घटनांमध्ये निष्कामी व्यवस्थापन कारणीभूत ठरते. यामुळे अनेक निष्पाप लोकांना अशा पद्धतीने मरावे लागते. जाणून घेऊया अशाच काही मोठ्या चेंगराचेंगरींच्या दुर्घटनांची माहिती.
लखनऊमध्ये 2002 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) रॅलीनंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते परतत होते. यावेळी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली. काही प्रवासी गाड्यांच्या छतावर चढले. त्यापैकी चार जणांना करंट लागून मृत्यू झाला. त्यानंतर सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. परिणामी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले.
छठ पूजेच्या निमित्ताने बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी स्टेशनवर होती. अचानक ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलल्याने ओव्हरब्रिजवर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. छठ पूजेचा आनंदाचा सण कित्येकांसाठी संकट बनला.
वाराणसीमध्ये गंगा स्नानासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी मुगलसराय जंक्शनवर परतत होती. या दिवशी स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 14 महिलांचा मृत्यू झाला आणि 40 हून जास्त प्रवाशी जखमी झाले.
कुंभ मेळ्यादरम्यान रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अचानक काही कारणावरून प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे प्रवाशांची धावपळ सुरु झाली. या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत 38 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून जास्त प्रवाशी जखमी झाले.
हे ही वाचा: रेल्वेच्या 'त्या' घोषणेनंतर प्रवाशांची धावपळ, तासाला 1500 तिकिटांची विक्री; दिल्लीत चेंगराचेंगरी का झाली?
मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक लोक गंभीर जखमी झाले होते.
दिवाळी आणि छठपूजेसाठी प्रवाशांची भरपूर गर्दी झाल्याने वांद्रे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत 9 प्रवाशी जखमी झाले.
रेल्वे स्थानकांवरील अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गर्दी नियंत्रणासाठी आणखी उपाययोजना केल्या गेल्या तर भविष्यात अशा घटनांना रोखता येईल.