मेष (Aries Zodiac)
टॅरो कार्ड्सच्या गणितांनुसार या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन सुरुवातीचा असणार आहे. तुमच्या भीती आणि संकोच मागे टाका आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. हा काळ प्रवासासाठी देखील अनुकूल असणार आहे. पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण योजना बनवणे तुमच्या हिताच ठरणार आहे. यामुळे भविष्यात कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. या आठवड्यात आत्मविश्वासाने आणि धैर्याने पुढे जाणे तुमच्या हिताच ठरणार आहे. तुमची सर्जनशीलता शिगेला पोहोचेल. काळजीपूर्वक नियोजन तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होणार आहे. तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे. जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. तुमच्या मागील प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार आहे. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी देखील हा चांगला असणार आहे. तुम्हाला फक्त संधी ओळखाव्या लागणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. परस्पर समज आणि समन्वय वाढणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये नवीन वळण येणार आहे. प्रेम आणि भागीदारीसाठी हा काळ शुभ सिद्ध असणार आहे. महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेणं हिताच ठरणार आहे. यामुळे तुमचे अंतर्गत संतुलन आणि समज वाढणार असून नातेसंबंध अधिक दृढ होणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणारा असणार आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेणं टाळा. तुमच्या भावना आणि विचार तुम्हाला समजून घ्यावे लागणार आहे. तुमचा आतला आवाज तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. तुम्हाला फक्त त्याचे ऐकावे लागणार आहे. आत्म-विश्लेषण आणि ध्यान तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि ऊर्जा या आठवड्यात उच्च पातळीवर राहणार आहे. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणार आहात. हा आठवडा तुमच्यासाठी यशाचा असणार आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकणार नाही. संयम आणि दृढनिश्चय कायम ठेवा. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग या आठवड्यात नक्की करा. सोबतच शक्तीचा वापर हुशारीने करा.
कन्या (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विराम आणि आत्मचिंतनाचा असणार आहे. एखाद्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. थोडा विलंब होणार आहे. पण आता तुमचा दृष्टिकोन बदलण्याची आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची वेळ असणार आहे. थांबून विचार करण्याची ही एक चांगली संधी या आठड्यात चालून आली आहे. धीर धरा आणि काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेणे तुमच्या हिताच ठरणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी न्याय आणि संतुलनाचा असणार आहे. कायदेशीर किंवा अधिकृत बाबींमध्ये निष्पक्षपणे वागणे तुम्हाला समजून घ्यावे लागणार आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला, अन्यथा त्याचा परिणाम भविष्यावर होईल. आत्मनिरीक्षण आणि सत्याचा मार्ग स्वीकारल्याने तुम्हाला शांती मिळणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल पाहिला मिळणार आहे. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या जुन्या सवयी, विचार किंवा नातेसंबंधांचा अंत होणार आहे. हा काळ कठीण असणार आहे. मात्र तो एका नवीन सुरुवातीचे संकेत असणार आहे. नकारात्मकता सोडून तुम्हाला नवीन प्रवासाकडे वाटचाल करायची आहे. या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीसाठी विश्वास आणि आशेचा आठवडा राहणार आहे. तुमच्या ध्येयांचा मार्ग मोकळा होणार असून तुमची स्वप्ने पुन्हा जगा. त्यासोबत आत्मविश्वासाने तुमच्या स्वप्नाचा पाठलाग करा. तुमचा तुमच्या मार्गावर पूर्ण विश्वास असेल. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि पाठिंबा मिळणार आहे. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि पुढे वाटचाल करा.
मकर (Capricorn Zodiac)
या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या जीवनात तेज आणि यश घेऊन आला आहे. तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहे. आत्मविश्वास वाढणार असून तुम्हाला आनंद आणि समाधान प्राप्त होणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगती पाहिला मिळणार आहे. ही सकारात्मक बदलाची वेळ असून त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात थोडा वेळ एकटे घालवावे लागणार आहे. हा काळ आंतरिक शांती आणि आत्मपरीक्षणाचा असणार आहे. महत्त्वाच्या निर्णयांसाठी स्वतःचे मार्गदर्शन करणार आहात. ध्यान आणि आध्यात्मिक साधना यांच्या माध्यमातून तुमचे विचार स्पष्ट होणार आहे. आत्मविश्वास आणि सत्याकडे वाटचाल करत रहा तुम्हाला फायदा होईल.
मीन (Pisces Zodiac)
या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना गोंधळ आणि दुविधेचा सामना करावा लागणार आहे. विचारात स्पष्टता नसणार आहे. तुम्हाला असे वाटेल की काहीतरी बरोबर होत नाहीय. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या भावनांकडे लक्ष देणं गरजे आहे. तुमच्या मनाचे ऐका आणि हे तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)