Accident News: कार-बसची जोरदार धडक; दुर्घटनेत 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू

Kerala Alappuzha Bus Accident: केरळमध्ये आजचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरला आहे. बस आणि कारची जोरदार धडक झाली असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये असलेल्या 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 3, 2024, 03:01 PM IST
Accident News: कार-बसची जोरदार धडक; दुर्घटनेत 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू  title=

Kerala Accident News: केरळच्या अलप्पुझामध्ये सोमवारी रात्री केरळ राज्य रस्ते परिवहन निगमच्या बसचा एका कारसोबत जोरात धडक झाली आहे. या अपघातात कारमधील पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे विद्यार्थी एमबीबीएसचे विद्यार्थी होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ही दुर्घटना कलारकोडजवळ रात्री 10 वाजता घडली. 

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात पोलीस सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, धडकेमुळे कारचे पूर्ण नुकसान झाले असून गाडीचे काच फोडून त्यात बसलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मृत हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे विद्यार्थी होते.

मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी) विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमध्ये सात जण होते, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमधील अन्य दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

दोन बसच्या अपघातात 34 प्रवासी जखमी

केरळमध्ये आणखी एक अपघात झाला आहे. हा अपघात विचित्र झाला असून कन्नूरमध्ये केएसआरटीसीच्या दोन बसची आमने-सामने टक्कर झाली आहे. या दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून हा अपघात किती जीवघेणा हे लक्षात आलं आहे. 2 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला आहे. या अपघातात 34 प्रवाशांचा अपघात झाला आहे.